ध्वजदिन संकलनात
एन सी सी चे योगदान
डाॅ गवळी शिरीष
०७/१२/२००५
आज दि ०७ डिसेंबर हा दिवस सशस्त्र ध्वजदिन म्हणून
संपूर्ण देशभर मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो देशासाठी प्राणार्पण करणाÅया सैनिकांची कृतज्ञतापूर्वक जाणीव ठेवण्यासाठी
ध्वजदिन साजरा केला जातो या ध्वजदिना
निमीत्ताने सैनिकांच्या उपकारातून उतराई होण्याची एक संधी नागरिकांना मिळते देश रक्षणासाठी थंडी, ऊन, पाऊस, यांची पAवा न करता डोंगर, पर्वत, दÅया खोÅयातून कडकपारीतून
अहोरात्र डोळ्यात तेल घालून देशाच्या कारगिल, द्रास, बटालिक इत्यादी
सीमेचे आकाश, जमिन आणि समुद्र
या तीनही माAगांनी येणाÅया शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी ज्यांनी
आपले उभे आयुष्य वेचले, ज्यांनी जीवाची
बाजी लावली आणि त्यात जे अधू,अपंग बनले, अशा या अपूर्व त्याग करणाÅया आजी व माजी
सैनिकांची आपणास आठवण राहावी तसेच अशा सैनिकांना व त्यांच्या कुटूcबbयांना स्वतंत्र भारताचे आदर्श नागरीक या नात्याने काही हातभार लावावा म्हणून
हा ध्वजदिन आपण देशभर साजरा करीत असतो
भारतातील अंर्तगत
शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या कामी सैनिक सतत कार्यरत असतात तसेच नैसAगिक व मानवी आपत्तीच्या वेळेस व्यवस्थापनाच्या कामी देशाला
या सैनिकांची फार मदत होत असते देशाला
सातत्याने भूकंप, महापूर, अतिवृष्टी, त्सुनामी लाटा इत्यादी नैसAगिक आपत्तीच्या वेळी व्यवस्थापनाच्या कामी सैनिकांची मदत
होत असतेच याकामी सैनिक आपल्य कुटुcबbयांपासून दूर राहून फार मोठा त्याग करीत आहेत
व आजही ते त्याग करीतच आहेत भारतीय
जवान हे जगात सर्वश्रेष्ठ मानले जातात
जिंकू किंवा मरू ही त्यांची ध्येयधोरणे व मोडेन पण वाकणार नाही हा त्यांचा
बाणा असतो धडापासून शिर वेगळे झाले तरी
नुसत्या धडाने लढणारे हे भारतीय वीर सैनिक यांच्या शौAयाची गाथा गावी तेवढी थोडीच अशा शूर वीरांचा, जवानांचा सन्मान करण्याचा हा दिवस त्यांच्या शौAयाचे पोवाडे गाण्याचा व त्यांच्या कAतृत्वाचा व यशाचा आढावा घेऊन त्यांना मानाचा मुजरा करण्याचा
हा दिवस तेव्हा याकामी आपले भारतीय सैनिक कोणज्याही बाबतीत तसूभरही मागे राहणार
नाही
राष्ट्रीय
छात्रसेनेमार्फत (एन सी सी ) ध्वजदिन निधी
संकलनाचे काम मोठ्या उत्साहाने केले जाते
राष्ट्रीय छात्र सेनेतील छात्रसैनिक कवायत, नेमबाजी, पॅरासिलींग,
नकाशा वाचन, गिAयारोहण, नागरी संरक्षण इत्यादी लष्करी प्रशिक्षण वर्षभर
घेत असतातच परंतु या ध्वजदिनानिमीत्ताने
अगदी पूर्व प्राथमिक शाळेपासून ते महाविद्यालयातील विद्याAथी / विद्याAथीनींकडून निधी
गोळा करीत असतात देशातील प्रत्येक व्यक्ती,
शेतकरी, व्यापारी, नोकरवर्ग डाॅक्टर
वकील इत्यादी तसेच संस्थेकडून निधी जमविण्यात येतो निधी देणाÅयास छोटा ध्वज मिळतो हा ध्वज अभिमानाने छातीवर किंवा
दूचाकी/ चारचाकी वाहनावर लावून आपण राष्ट्रीय काAयात सहभागी झाल्याचे इतरांना सांगत असतो या ध्वजदिन निधीस देणगी मदतीच्या रकमेला
आयकरातून सूट मिळते त्यामुळे
प्राप्तीकरातून सूट मिळविण्यासाठी अलिकडच्य काळात प्राप्तीकरदाते या ध्वजदिन निधीस
सढळ हाताने मदत करीत आहेत
ध्वजदिन निधीची
रक्कम प्रामुख्याने माजी सैनिकांच्या व त्यांच्या कुटुcबbयांसाठी वापरली
जाते तसेच सैन्यातून परत आल्यानंतर वृध्द्
झालेल्या व अपंगत्व आलेल्या माती सैनिकांच्या किमान गरता पूरविण्यासाठी तसेच
आघाडीवर असलेल्य कुटुcबbयांच्या मदतीसाठी वापरला जातो जिल्हाधिकारी हे जिल्हा सैनिक मंडळाचे अध्यक्ष
असतात जवानांचा गौरव व्हावा व वीरांचे
स्मरण व्हावे या उदात्त हेतूने ध्वजदिनानिमीत्त विविध प्रकारचे सांस्कृतिक
कार्यक्रम आयोजित करून निधी संकलनाचे काम राष्ट्रीय छात्रसेना, शासकीय व निमशासकीय संस्थांकडून केले जाते या रकमेचा विनीयोग जवानांच्या विधवा झालेल्या
पत्नी यांना शिलाई मशीनसारख्या स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध करून दिली जातात तसेच जवानांच्या पाल्यासाठी स्वतंत्र वसतिगृहे बांधून शिक्षणासाठी मदत केली
जाते ध्वजदिन निधी संकलनाचे कार्य
केल्याबद्गल राष्ट्रीय छात्रसेना व संस्थांना जिल्हाधिकाÅयांच्या हस्ते या ध्वजदिनानिमीत्त सन्मानपत्र दिले जाते
आपल्या देशातील
सैनिक स्वतःच्या जीवाची पAवा न करता
देशसेवेचे कार्य करीत असतात त्यामुळे
अप्रत्यक्षरित्या आपले व आपल्या संपत्तीचे रक्षण होते या निधी संकलनाच्या कामी
राष्ट्रीय छात्रसेना सतत आघाडीवर असते
तेव्हा या राष्ट्रीय काAयासाठी सर्व
नागरीकांनी सढळ हाताने मदत करून आपल्या सैनिकांबद्गल आपला जिव्हाळ्याचा स्नेह
वाढवावा राष्ट्रसेवा करणाÅया सैनिकांच्या उपकारातून उतराई होण्याची ही एक
सुवर्णसंधी आहे
No comments:
Post a Comment