असा आहे अहमदनगर जिल्हा!
डाॅ बारहाते जी एच
दि २६ जानेवारी २०११
भारतीय द्विपकल्पाच्या उत्तर पश्चिम भागात वसलेला महाराष्ट्र हा प्रामुख्याने पठारी प्रदेश आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झालेली आहे महाराष्ट्राचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे ७०० कि मी व पूर्व-पश्चिम विस्तार ८०० कि मी असून एकूण क्षेत्रफळ ३ ०८ लाख चौ कि मी आहे किनारपट्टीस समांतर दक्षिणोत्तर गेलेल्या सह्याद्री पर्वतरांगामुळे व पश्चिम घाट रांगामुळे राज्याचे कोकण आणि पठार असे दोन प्रमुख भाग पडलेले आहेत
सह्याद्रीमध्ये उगम होऊन पश्चिमेकडे वाहत जाणाÅया नद्या कोकण किनारपट्टीत आढळून येतात महाराष्ट्रातील सह्याद्रीची लांबी सुमारे ८०० कि मी असून सरासरी उंची सुमारे ९०० मीटर आहे थळघाट, फोंडाघाट, अंबोलीघाट,हे सह्याद्री पर्वतातील प्रमुख घाट आहेत सह्याद्रीच्या पूAवेस घाटमाथ्यावर १४३८ मीटर उंचीवर महाबळेश्वरसारखे पठार आहे तर १६४६ मीटरवर कळसुबाईचे सAवोच्च शिखर आहे सह्याद्रीच्या पूAवेस महाराष्ट्राचे विस्तीर्ण असे पठार पसरलेले आहे सह्याद्रीमध्ये उगम पावून पूAवेस वा आग्नेयेस वाहणाÅया गोदावरी, भीमा व कृष्णा या महत्वाच्या नद्या पठारावरुन वाहत गेल्या आहेत
तापमान व पर्जन्य ः- महाराष्ट्र हे राज्य उष्ण कटीबंधीय मोसमी हवामानाच्या प्रदेशात येते राज्याच्या पश्चिम किनारपट्टीतील हवामान सम व दमट असून जसजसे पूAवेकडे जावे तसतसे विषम व कोरडे होत गेले आहे मोसमी पावसामुळे उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे प्रमुख ऋतू दिसून येतात राज्याच्या मध्य-पूर्व भागातील सरासरी तापमान ४० डिग्री सेंटीग्रेडच्या पुढे असते तुलनेने नासिक, अहमदनगर,पुणे,कोल्हापूर,सातारा,सांगली या भागातील तापमान कमी असते समुद्राच्या सानिध्यामुळे कोकणातील तापमान तुलनेत सAवात कमी असते
राज्यातील पावसाचे प्रमाणही असमान आहे राज्याच्या शुष्क प्रदेशात ४५ सें मी इतका कमी तर पश्चिम घाट प्रदेशात सरासरी ६०० सें मी पाऊस पडतो मुंबई,कोकणातील पर्जन्यमान चांगले असते पावसाळी नक्षत्राची सुरुवात साधारणपणे ७ जूनच्या आसपास होते तर शेवट नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस असतो काही वेळेस पूर्व हंगामी पावसामुळे शेतीला फायदाही होतो
शेती ः- महाराष्ट्रात पिकाखालील क्षेत्र २ २४ कोटी हेक्टर इतके आहे, परंतु यापैकी सिंचनाखालील क्षेत्र ३६ ६७ लाख हेक्टर आहे म्हणजेच केवळ १६ ४० प्रतिशत क्षेत्रासाठी सिंचनसुविधा उपलब्ध आहे यापैकी अन्नधान्य पिकाचे प्रमाण एकूण लागवड योग्य क्षेत्राशी ६१ प्रतिशत असे आहे राज्यातील वन क्षेत्राचे प्रमाण १६ ९४ % आहे तसेच ओसाड क्षेत्राचे प्रमाण ५ ६१ % आहे महाराष्ट्रात बिगर सिंचनाखालील क्षेत्रामध्ये ज्वारी हे महत्वाचे पीक असून जवळपास ५० लाख हेक्टर क्षेत्र हे एकाच प्रकारच्या पिकाचे आहे महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, गहू, कापूस, तांदुळ, ऊस, तृणधान्ये,कडधान्ये,भुईमुग अशा महत्वाच्या पिकांचा समावेश होतो पावसाचे प्रमाण, कृषीमालाचे बाजारभाव, नगदी पिकांचे दर, भांडवलाची उपलब्धता, सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता इ विविध घटकांवर महाराष्ट्रातील पीक पद्धती अवलंबून आहे एखाद्या वAषी उसाचे प्रचंड उत्पादन होते, दर कमी मिळतो तर पुढच्या वAषी उसाकडे शेतकÅयाने पाठ फिरविलेली असते उसाच्या कमतरतेमुळे पळवापळवी सुरु होते कांदा साठवण कालावधी कमी असतो तसेच साठवण क्षमता कमी असल्याने दर वाढतात, परंतु एकूण उत्पन्नात वाढ होत नाही अशा चक्रात महाराष्ट्रातील शेतकरी सापडलेला आहे
अहमदनगर जिल्हा ः- अहमदनगर जिल्ह्याची ऐतिहासिक,सांस्कृतिक,अध्यात्मिक व सहकाराच्या पार्श्वभूमीमुळे या जिल्ह्यास विशेष महत्व प्राप्त झाले आहे तथापि हा जिल्हा लगतच्या जिल्ह्यांच्या तुलनेत अविकसित आहे महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी उर्ध्व गोदावरी आणि भीमा नद्यांच्या खोÅयात बसलेला आहे अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १७४१२ चौ कि मी असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात सAवाधिक मोठा आहे महाराष्ट्र राज्याच्या ५ ६६ % क्षेत्रफळ एकट्या अहमदनगर जिल्ह्याचे आहे प्रशासकीय सोयीसाठी महसूल खात्याने जिल्ह्यातील १४ तालुक्यांची विभागणी अहमदनगर, कर्जत, श्रीरामपूर, संगमनेर अशा चार उपविभागात केली आहे
जिल्ह्यातील तालुक्यांची विभागणी
अ क्रं
उपविभाग
समाविष्ट केलेले तालुके
१
अहमदनगर
अहमदनगर,पारनेर,पाथAडी,शेवगाव
२
कर्जत
कर्जत,श्रीगोंदा,जामखेड
३
श्रीरामपूर
श्रीरामपूर,नेवासा,राहुरी,राहाता
४
संगमनेर
अकोले,संगमनेर,कोपरगाव
अहमदनगर जिल्ह्याची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेप्रमाणे ४० ८८ लाख इतकी असून,त्यापैकी ८० ३४ % लोकसंख्या ग्रामीण व उर्वरित १९ ६६ % लोकसंख्या शहरी भागात राहते जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता प्रति चौ कि ला २३५ असून महाराष्ट्राच्या सरासरीपेक्षा (३१४ व्यक्ती) कमी आहे जिल्ह्यात सAवाधिक लोकसंख्येची दाटी श्रीरामपूर तालुक्यात असून प्रति चौ मी मध्ये ४५० लोक राहतात पारनेर तालुक्यात सAवात कमी म्हणजे प्रति चौ मी मध्ये लोकसंख्येचे प्रमाण केवळ १२८ आहे म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण विषम आहे
जिल्ह्यातील १४ तालुक्यांचे एकूण चौ कि मी क्षेत्रफळ व खेड्यांची संख्या
अ क्रं
तालुका
चौ कि मी
खेड्यांची संख्या
१
अहमदनगर
१५२४ ७५
११२
२
पारनेर
१९३३ २५
१३१
३
पाथAडी
१२०३ ४९
१३५
४
शेवगाव
१०३१ २९
११२
५
कर्जत
१४९३ ०७
१२१
६
श्रीगोंदा
१६०५ ८३
११५
७
जामखेड
८७२ ६२
८७
८
श्रीरामपूर
५६९ ८७
५६
९
नेवासा
१२८६ ५५
१२९
१०
राहुरी
१०२० १२
९८
११
राहाता
६५९ १९
६०
१२
संगमनेर
१६७८ ८२
१७१
१३
अकोले
१५०३ ७९
१९१
१४
कोपरगाव
७२५ १६५
८१
यावरुन स्पष्ट होत की, क्षेत्रफळाच्या दृष्टीने पारनेर तालुका सAवात मोठा आहे, परंतु लोकसंख्येची घनता मात्र कमी आहे अकोला तालुक्याचा बराचसा भाग आदिवासी असून या तालुक्यात एकूण १९१ खेडी आहेत तर श्रीरामपूर तालुक्यात केवळ ६० खेडी आहे
जमीन ः- ज्वालामुखीच्या लाव्हारसापासून संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचा भूस्तर तयार झालेला असून तो " दख्खन टापू " नावाने ओळखला जातो जिल्ह्यातील जमिनीचे साधारणपणे तीन भाग पडतात
१ नदीकाठची पोयट्याची पांढरट जमीन २ डोंगराळ उतारावरची काळी दगडी गोटे मिश्रीत जमीन ३ पांढरट चुनखडीयुक्त जमीन भूजल सAव्हेक्षण विकास यंत्रणा,अहमदनगर यांच्याकडील माहितीनुसार अहमदनगर जिल्हा गोदावरी,भीमा व सीना यांच्या खोÅयातील ८० % पाणलोट क्षेत्रात विभागला आहे प्रवरा व मुळा खोÅयातील जमीन जास्त सुपिक आहे पारनेर तालुक्यातील मात्र बराचसा भाग चुनखडीयुक्त जमिनीने व्यापला आहे काही ठराविक भाग वगळता जिल्ह्यातील भूजल घरगुती वापरासाठी व शेतीसाठी चांगल्या प्रतिचे आहे काही भागातील भूजल क्षारयुक्त असून पिण्यासाठी अयोग्य आहे जमिनीत सर्वसाधारणपणे ३०० फुटापर्यत पाणी उपलब्ध आहे
अहमदनगर जिल्ह्यात खरीप,रब्बी आणि उन्हाळी असे तीन कृषी उत्पादनांचे हंगाम प्रचलित आहेत खरीप हंगामाची सुरुवात जूनपासून होते बाजरी, खरीप ज्वारी, तांदूळ, नाचणी ही धान्य पिके तर मठ, मूग ही कडधान्य आणि भुईमुग, सूर्यफूल व सोयाबीन ही तेल गळीताची पिके घेतली जातात रब्बी हंगामात मुख्यतः गहू, कांदा,हरबरा ही पिके घेतली जातात तसेच नगदी पिकांमध्ये प्रामुख्याने ऊस, कपाशी, कांदा ही महत्वाची पिके आहेत अलिकडच्या काळात मात्र आल्याचे पीक व कपाशीच्या धारणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते २००९-१० मध्ये कपाशीची प्रतिक्विंटल सरासरी किंमत ३००० रुपये होती २०१०-११ मध्ये ही किंमत ४००० रुपयांपेक्षाही अधिक आहे जानेवारी २०११ च्या सुरुवातीस कापसाचा दर प्रतिक्विंटल ५००० रुपयांपेक्षाही अधिक झाल्याने पुढील वAषी कपाशीच्या लागवड क्षेत्रात निश्चितपणे वाढ होईल अशी परिस्थिती कांदा पिकाच्या बाबतीत आहे कांदा कधी शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आणतो तर कधी ग्राहकांच्या-गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणतो यावAषी मात्र सरकारच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले याचा परिणाम म्हणजे यावAषीच्या हंगामामध्ये कांद्याच्या लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली बाजारपेठेतील कांद्याचे दर पाहून शेतक-यांना प्रचंड पैसा मिळाला असा गैरसमज निAमाण झाला व कांद्याच्या बियाणापासून तर सर्व मजुरीचे दर दोन ते तीन पटीने वाढले काही मोजक्या शेतक-यांचा फायदा झाला, परंतु सर्वच घटकांच्या किंमतीत वाढ झाली
अहमदनगर जिल्ह्यातील जमीन वापराचे क्षेत्र
अ क्रं
तालुका
चौ कि मी
खेड्यांची संख्या
१
जंगलव्याप्त क्षेत्र
१५२
८ २०
२
शेतीलायक नसलेले क्षेत्र
१३३
७ ६६
३
लागवड न केलेली इतर जमीन
१०३
५ ९५
४
एकूण पड जमीन (चालू व इतर)
१३८
७ ९४
५
निव्वळ पिकाखालील क्षेत्र
१२१५
६९ ७५
एकूण
१७४१
१०० ००
अलिकडच्या काळात जमिनीच्या विविध सुधारणा, पाण्याची उपलब्धता, शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन यामध्ये सकारात्मक बदल झाल्याने लागवडीखालील शेती क्षेत्रात वाढ होत आहे एकूण लागवड १४०० हजार हेक्टरच्या जवळपास आहे यापैकी ऊस व गळीताच्या नगदी पिकांचे क्षेत्र ११ ते १२% आहे
पीक पध्दती - तृणधान्ये,कडधान्ये, मसाल्याची पिके, फळे व भाजीपाला, कपाशी, सोयाबीन, सूर्यफूल, ऊस इ महत्वाची पिके अहमदनगर जिल्ह्यात घेतली जातात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किमान एक सहकारी साखर कारखाना आहे तसेच जिल्ह्यातील एकूण १७ सहकारी, १ खासगी कारखाना असून अजून दोन खासगी कारखान्यांची उभारणी चालू आहे सिझन काळात दररोज सरासरी ५०००० मे टनापेक्षा अधिक गाळप होते साखरेचे उत्पादनही सरासरी ११ ५% साखर उतारा असल्याने दररोज जवळपास ५०००० क्विंटलपेक्षा अधिक साखर उत्पादन होते अलिकडच्या काळात गोदावरी, भीमा खो-यातील पाण्याची उपलब्धता, पावसाचे योग्य प्रमाण, भूगर्भतील पाणी पातळीत वाढ व २००९-१० च्या गळीत हंगामामध्ये ऊसाला ब-यापैकी मिळालेला दर यामुळे ऊसाच्या लागवड क्षेत्रात वाढ झालेली आहे जवळपास जिल्ह्यातील ११% क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे २०१०-११ च्या गळीत हंगामामध्ये मात्र ऊसाच्या उत्पादन खAचात वाढ होवूनही साखरेच्या दरातील संघAषातून पहिली उचल १८०० रुपये देण्याचे साखर कारखान्यांनी मान्य केले शासकीय स्तरावर करार होवूनही प्रत्यक्षात १४५० ते १६०० रुपये प्रतिटन याप्रमाणे पहिले पेमेंट वाटप सुरु केले असून शेतक-यांची आAथिक पिळवणूक केली आहे ऊसाचे आगार समजल्या जाणा-या अहमदनगर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांची परिस्थिती जरा नाजूकच आहे वास्तविक ऊसासाठी जास्त पाणी लागते ऊसाच्या पक्वतेचा कालावधी किमान १३ ते १४ महिने त्यानंतर ऊसाचे गळीत व एकूण तीन टप्प्यात पेमेंट होते वरील दीड वAषाच्या कालावधीत इतर दोन-तीन पिके घेता येतात, परंतु नगदी पीक म्हणून व मजुरांची कमतरता यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी पीक पद्धतीमध्ये फारसा बदल करण्यास तयार नाहीत काही प्रगतशील शेतकÅयांनी फळे व भाजीपाल्याकडे आपला मोAचा वळविला, परंतु अशा बदलाचे प्रमाण अल्प आहे तसेच काही भागात पावसावर अवलंबून पिके घ्यावी लागतात उदा अकोले भागात भाताचे पीक मोठ्या प्रमाणात होते तर राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव, नेवासा, शेवगाव, श्रीगोंदा, पारनेर या भागात गहू पिकाचे क्षेत्र लक्षणीय असते उत्पादन खर्च व पिकाला येणारी किंमत यांचा तुलनात्मक विचार केला तर शेतीच्या पिकांचे अर्थशास्त्र फारसे समाधानकारक नसते तरीही अहमदनगर जिल्ह्यातील शेतकÅयाने काही प्रमाणात तरी आधुनिक शेतीचा मार्ग स्वीकारलेला आहे
अहमदनगर जिल्ह्यातील एकूण लागवड क्षेत्रापैकी ७० % क्षेत्रात तृणधान्ये व कडधान्याचे पीक घेतले जाते उसाचे क्षेत्र १० % , फळ व भाजीपाला ३%, कपाशी १ %, तेलबिया ५%, अशी प्रमुख पीक पद्धती आहे अलिकडच्या २ ते ३ वAषापासून मात्र शेतकÅयांनी कापसाला अधिक अधिक पसंती दिली असून, कांद्याच्या बाबतीत नाशिक जिल्ह्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचा क्रमांक लागतो
जलसिंचन सुविधा ः- अहमदनगर जिल्ह्यात मुळा, भंडारदरा,निळवंडे हे मोठे प्रकल्प तसचे गंगापूर (गोदावरी (उर्ध्व कालवा) जि नाशिक, घोड, कुकडी या पुणे जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांच्या कालव्यांच्या पाण्याद्वारे तसेच जायकवाडी धरणाच्या बॅक वाॅटरमुळे नेवासा, शेवगाव व पाथAडी या तालुक्यातील काही क्षेत्र ओलीताखाली आले आहे या सर्व प्रकल्पांची एकूण सिंचनक्षमता २०८ हजार हेक्टर आहे त्याच प्रमाणे विसापूर, आढळा, पारगाव, घाटशिळ, मांडओहोळ, भोजापूर, माहेसांगवी व सीना मध्यम प्रकल्पांची एकूण सिंचन क्षमता ७१ हजार हेक्टर असून ९० लघु पाटबंधाÅयाच्या विविध कामांची सिंचन क्षमता २३ हजार हेक्टर आहे तसेच जिल्ह्यामध्ये गोदावरी खोÅयामध्ये प्रामुख्याने मुळा-प्रवरा नदीच्या क्षेत्रात व जिल्ह्याच्या दक्षिणेच्या भागात लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत मुख्यतः कोल्हापूर पद्धतीच्या बंधाÅयाची साखळी निAमाण केली असून त्याद्वारे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे
मोठे, मध्यम व लघु सिंचनाचे प्रकल्प, उपसा जलसिंचन योजना, विहिरी, कुपनलिका ही जिल्ह्यातील प्रमुख जलसिंचनाची साधने आहेत व त्याद्वारे जवळपास ३६ ५३% क्षेत्र ओलिताखाली आले आहे सिंचनासाठी आधुनिक पद्धतीचा वापर केल्यास (तुषार सिंचन, ठिबक सिंचन) व पाण्याचा अपव्यय टाळल्यास जिल्ह्यातील ४८% क्षेत्र ओलिताखाली आणता येईल ओलिताखालील एकूण क्षेत्रापैकी लागवडीखालील क्षेत्राची तालुकानिहाय माहिती (२००२-०३) पुढीलप्रमाणे आहे
अ क्र
तालुका
ओलिताखालील एकूण
क्षेत्राची लागवड क्षेत्राची%
अ क्र
तालुका
ओलिताखालील एकूण
क्षेत्राची लागवड क्षेत्राची%
१
अकोले
१२
८
पाथAडी
१५
२
संगमनेर
२२
९
नगर
२०
३
कोपरगाव
४७
१०
राहूरी
८४
४
राहाता
४०
११
पारनेर
२०
५
श्रीरामपूर
६६
१२
श्रीगोंदा
६६
६
नेवासा
५६
१३
कर्जत
२३
७
शेवगाव
२४
१४
जामखेड
१४
जिल्ह्याची सरासरी ३६
अहमदनगर जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी, हा जिल्हा सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी अहमदनगर जिल्हा 'व्हिजन २०२०' सिंचनाविषयीचे नियोजन करण्यात आले आहे तसेच एकूणच जिल्ह्याच्या सर्व क्षेत्रात विकास होण्यासाठी आगामी १० वAषात करावयाच्या कामाचे नियोजनही शासकीय स्तरावर कराण्यात आले आहे
अहमदनगर जिल्ह्यातील सिंचन क्षेत्राच्या वाढीसाठी जिल्हास्तरावर सिंचन क्षेत्र विकास समितीची स्थापना करण्यात आलेली आहे समितीमध्ये १० सदस्य असून अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगर, हे समन्वयक आहेत तसेच जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील सर्व कार्यकारी अभियंता हेही सदस्य आहेत
अहमदनगर जिल्हा कृष्णा व गोदावरी खोरे यामध्ये विभागला आहे उत्तरेकडील ३४ टक्के भाग गोदावरी खो-याच्या क्षेत्रात येतो दक्षिणेकडील ३४ टक्के भाग कृष्णा खो-याच्या क्षेत्रात येतो गोदावरी खोरे अंतर्गत गोदावरी, मुळा, प्रवरा, आढळा, म्हाळुंगी, मांडओहोळ, किन्हा या नद्यांचा समावेश होतो कृष्णा खोरे अंतर्गत भीमा, घोड, सीना व खैरी या नद्यांचा समावेश होतो वरील दोन महत्वाच्या नद्यांच्या व उपनद्यांच्या क्षेत्राव्यतिरिक्त जिल्ह्यातील विविध लघुसिंचन प्रकल्पांचा लाभ शेतक-यांना व इतर घटकांना होतो असे एकूण ३९२७ लघु प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यात आहेत तसेच धरणे व लघु प्रकल्पांद्वारे पिण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी पाण्याचा वापर होतो व अशा २१६ योजना जिल्ह्यात कार्यरत आहेत लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगर, यांनी 'व्हिजन २०२०' साठी अहमदनगर जिल्ह्याची सिंचन व्यवस्थेची सcक्षbप्त माहिती पुढीलप्रमाणे दिली आहे त्यातील काही ठळक मुद्दे-
· जिल्ह्याचे क्षेत्रफळ- १७०४८ चौ कि मी
· लागवडीखालील क्षेत्र-१४ ४९ लाख हेक्टर
· अcतbम सिंचनक्षमता- ५ ४० लाख हेक्टर
· लागवडीलायक क्षेत्राशी टक्केवारी- ३६ ५३%
· जिल्ह्याच्या सिंचनातील कायमस्वरुपी अनुशेष -निरंक
· जून २०१० अखेर निAमाण झालेली सिंचन क्षमता-४ ४३ लाख हेक्टर
· प्रगतीपथावरील प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर निAमाण होणारी सिंचन
क्षमता - ९७२५८ हेक्टर
यावरुन स्पष्ट होते की, सर्व प्रकारच्या सिंचन प्रकल्पांद्वारे ३६ ५३% क्षेत्र ओलीताखाली येवू शकते पाणी प्रवाही पध्दतीने देण्यापेक्षा ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यास जवळपास ५०% क्षेत्र ओलिताखाली येवू शकेल
अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय निमाAण झालेले व अcतbम निAमाण होणारे सिंचन क्षेत्र (हेक्टर)
अ क्र
तालुका
लागवडीलायक क्षेत्र
जून २०१० अखेर निAमाण झालेले सिंचन क्षेत्र
टक्केवारी
जून २०१० अखेर निAमाण होणारे सिंचन क्षेत्र
टक्केवारी
१
अकोले
१०३८७६
३१३७९
३० २१
४२००७
४० ४४
२
संगमनेर
१३२१५२
२५६६१
१९ ४२
५३७९०
४० ७०
३
कोपरगाव
६२९९८
२४४३०
३८ ८३
३०६३५
४८ ६९
४
राहाता
६५८३३
१८१३२
२७ ५४
३९८४६
६० ५३
५
श्रीरामपूर
४६७८१
२१८९३
४६ ८०
२७५६८
५८ ९३
६
नेवासा
९२२०९१
५६२४५
४६ १०
५६२८५
४६ १३
७
शेवगाव
१०५१५५
२८८२६
२७ ४१
३५९३०
३४ १७
८
पाथAडी
११२५२२
१६३३५
१४ ५२
१७४५१
१५ ५१
९
नगर
१३१४५२
१७७७६
१३ ५२
१९८३०
१५ ०९
१०
राहूरी
८३४४७
२९५४१
३५ ४०
३७७९५
४५ २९
११
पारनेर
१५६९९३
३४९०८
२२ २४
३८८८२
२४ ७७
१२
श्रीगोंदा
१४१९९६
६३५८७
४४ ७८
६४१७२
४५ १९
१३
कर्जत
१३४१६९
६२८६६
४६ ८६
६३१२५
४७ ०५
१४
जामखेड
८०९८९
११५७५
१४ ४३
१३०९६
१६ ३३
एकूण
१४७९४९४
४४३१५४
२९ ९५
५४०४१२
३६ ५३
संदर्भ लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, अहमदनगर
जिल्ह्यातील प्रगतीपथावरील सिंचन प्रकल्प -
भंडारदरा, मुळा, कुकडी हे मोठे प्रकल्प पूर्ण झाले असून त्यांचा फायदा जिल्ह्याला होतो तसेच पूर्ण झालेल्या मध्यम प्रकल्पांमध्ये आढळा, मांडओहोळ, घाटशिळ, पारगाव, सीना या प्रकल्पांचा समावेश होतो या व्यतिरिक्त पुढील प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे
१) उर्ध्व प्रवरा प्रकल्प (निळवंडे २) - या प्रकल्पाची क्षमता ८ ३२ टीएमसी आहे उजव्या व डाव्या कालव्याची लांबी अनुक्रमे ९७ व ९५ कि मी असून प्रस्तावित सिंचन क्षमता ६४२६० हेक्टर आहे या प्रकल्पामुळे अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, राहुरी व कोपरगाव या तालुक्यांना सिंचनाचा लाभ होणार आहे साधारणपणे जून २०१८ अखेर सर्व प्रलcबbत कामाची पूर्तता होऊन वरीलप्रमाणे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे
२) मध्य प्रकल्प - ताजना उपसा सिंचन योजना टप्पा क्र २ (खानापूर उपसा सिंचन योजना) या योजनेचा लाभ प्रामुख्याने शेवगाव तालुक्याला मिळणार आहे यासाठी जायकवाडी धरणातील ३८७८ द ल घ फू पाणी आरक्षित केले आहे या योजनेद्वारे मिळणा-या पाण्याचा वापर मुख्यतः तुषार सिंचन व ठिबक सिंचनासाठी मिळणार आहे तसेच पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रयोजन आहे ठिबक व तुषार सिंचनासाठी हा प्रकल्प जिल्ह्यात पारदAशी प्रकल्प ठरणार आहे
सीना मध्यम प्रकल्प-भोसेखिंड बोगदा- कर्जत तालुक्याला फायदेशीर
भंडारदरा व मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी पश्चिमेकडे वाहून अरबी समुद्राला मिळते हे वाया जाणारे जास्तीचे पाणी पूAवेकडे वळविण्याच्यादृष्टीने प्राथमिक पाहणी झाली असून भविष्यकाळात पाणी मुळा व प्रवरा नदीच्या खो-यात वळविता आले तर त्याचा फायदा अहमदनगर जिल्ह्यातील शेतक-यांना व बिगर सिंचनासाठी होणार आहे
भंडारदरा धरण हे १९१० ते १९२६ या कालावधीत अकोले तालुक्यातील भंडारदरागावाजवळ प्रवरा नदीवर बांध्ण्यात आले आहे या धरणाचे आयुष्य ८४ वर्ष झाले असून धरणाचे आयुष्य वाढविण्यासाठी मजबुतीकरणाच्या ठोस उपाययोजना राबविणे आवशयक आहे धरणावरील ८२ वAषाचे जुने व्हाॅल्व बदलून नवीन बसविणे, धरणातील गाळ काढणे आवश्यक आहे त्यामुळे साठवण क्षमतेतही वाढ होईल शासकीय स्तरावर याचा विचार होऊन निधीची उपलब्धता होणे आवश्यक आहे
वरील सर्व बाबींचा विचार केला तर लक्षात येते की, अविकसित असणारा अहमदनगर जिल्हा विकासाच्या वाटेने निश्चितपणे मार्गक्रमण करणार आहे सिंचनाच्या माध्यमातून शेतीचा, व्यवसायाचा व उद्योगाचा विकास होणार आहे जिल्ह्यातील सर्व सहकारी साखर कारखाने सिंचन व्यवस्थेवर अवलंबून असल्याने शेतक-यांच्या व कारखान्यांच्यादृष्टीने विविध सिंचन प्रकल्प महत्वाचे आहेत जिल्ह्याच्या विकासासाठी मुलभूत सुविधांची उपलब्धता व विकास होण्यासाठी 'व्हिजन २०२०'ची कार्यक्षमतेने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व जनता 'व्हिजन २०२०'च्या अंमलबजावणीवर लक्ष देवून आहे