Ratan Tatanna Varas Milena ! by Dr Adik B R , Dt १८ April २०११
रतन टाटांना वारस मिळेना!
डाॅ आदिक बी आर
१८ एप्रिल २०११
टाटा- बिAला ही भारतातील घरगुती नाव आहेत! कोणतीही खAचाची बाब आली तर मी काय टाटा बिAला आहे काय असे उद्गार प्रत्येकजण अनेकदा काढत असतो टाटा बिAला म्हणजे उद्योजकता श्रीमंती औदार्य अशी समीकरणे झालेली आहेत टाटा बिAला ही भारतीय उद्योग विश्वातील अत्यंत कर्तृत्ववान घराणी आहेत डिसेंबर २०१२ मध्ये रतन टाटा वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करीत आहेत व निवृत्त होत आहेत टाटांच्या अनेक उद्योगांची प्रमुख कंपनी टाटा सन्सचे रतन टाटा हे चेअरमन आहेत रतन टाटांच्या निवृत्तीनंतर टाटा सन्सला योग्य वारस मिळेणा या बाबतचा हा फेरफटका !
रतन टाटांना योग्य वारस शोधण्यासाठी आॅगस्ट २०१० मध्ये पाच सदस्य असलेली एक समिती नेमलेली आहे टाटा सन्स कंपनीचे डायरेक्टर आर के कृष्णकुमार हे या समितीचे एक सदस्य आहेत त्यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्टपणे कबूल केले की आठ महिने कसून शोध घेऊनही समितीला रतन टाटांना वारस शोधण्यास अपयश आले आहे शोध समितीच्या मते रतन टाटा हे जन्मतःच उद्योजक होते धाडसी वृत्ती निर्णय घेण्याचे कौशल्य आणि सहकाÅयांना प्रोत्साहित करण्याचे त्यांच्यात जन्मजात कसब आहे जगात सर्वत्र त्यांचा प्रभाव पडतो त्यांना योग्य पAयाय शोधणे अत्यंत कठीण काम आहे १२१ कोटींच्या जनसंख्येत किमान ७० कोटी लोक कामकरी गटात मोडतात शोध समितीला या ७० कोटी लोकांमध्ये रतन टाटांना पAयाय ठरू शकेल, अशी एक ही व्यक्ती दिसत नाही ही मोठी आश्चAयाची गोष्ट आहे
आपला वारस हा जन्माने भारतीयच असला पाहिजे असा आपला आग्रह नाही असे रतन टाटांनी स्पष्टपणे साcगbतलेले आहे तेव्हा शोध समितीचा शोध वारस शोध हा भारतापुरता सिमीत राहणार नाही,परंतु ७१ अब्ज डाॅलर कंपनीचा प्रमुख भारतीयच असावा अशी सर्व भारतीयांची मनोमन इच्छा आहे व असेल टाटांच्या अनेक कंपन्यांची टाटा सन्स ही प्रमुख कंपनी आहे या सर्व कंपन्यांचे अनेक भागधारक असले तरी सAवाधिक भाग असलेले टाटा हे निAणायक भागधारक आहेत अमूक एका व्यक्तीला रतन टाटांचा वारस नेमण्यासाठी आंदोलनही करता येत नाहीद्य् रतन टाटांनी हा पेच स्वतःच निAमाण केलेला आहे जर त्यांनी लग्न करून वारस पैदा केला असता? तर हा प्रश्न निAमाणच झाला नसता परंतु केवळ उद्योगवाढीवर लक्ष केंद्रीत केल्याने रतन टाटांना लग्न करण्यास वेळच मिळाला नाही आयुष्यभर केवळ वारस निAमाण करण्याचाच "उद्योग" करणाÅयांना रतन टाटांची कीव येईल टाटा उद्योगाचे संस्थापक जमशेठजी टाटा यांचे रतन टाटा हे पणतू आहेत व नवल टाटांचे चिरंजीव आहेत २८ डिसेंबर १९३७ साली मुंबई येथे त्यांचा जन्म झाला १९४४ साली नवल टाटांनी आपल्या पत्नीशी फारकत घेतल्याने रतन टाटांचे संगोपन त्यांच्या आजी लेडी नवाजबाई यांनी केले मुंबईमधील कम्पीयन स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर ते अमेरिकेतील काॅAनेल विद्यापीठात गेलेत १९६२ मध्ये त्यांनी इcजbनीअरींग व आAकिटेक्चरमधील पदवी प्राप्त केली त्यानंतर जगप्रसिध्द् हारवर्ड बिझनेस स्कूलमधून मॅनेजमेंटची डिग्री घेतली उच्चशिक्षित रतन टाटांना जगातील पहिला संगणक तयार करणाÅया आयबीएम या कंपनीने नोकरी देऊ केली; परंतु टाटा उद्योग समुहाचे त्यावेळचे प्रमुख जेआरडी टाटा यांच्या सल्ल्यानुसार रतन टाटा भारतात आलेत
चांगल्या शिकलेल्या आपल्या पुतण्याला टाटाउद्योग समूहातील कोणत्याही कंपनीचे प्रमुखपद जेआरडींनी द्यायला हवे होते परंतु त्यांनी रतनला जमशेदपूर येथील त्यांच्या पोलाद कारखान्यात एक साधा कामगार म्हणुन भरती केले कामगारांचे निळे कपडे घालून आग ओकणाÅया ब्लास्ट फरसेन समवेत रतन काम करत असे हातगाडीतून दगडी कोळसा व इतर साहित्य वाहण्याचे काम त्यांनी केले तब्बल आठ वAषे खालच्या स्तरावरील विविध कामांचा अनुभव घेतल्यानंतरच १९७१ साली त्यांना टाटांच्या नेल्को कंपनीचे डायरेक्टर नेमण्यात आले आपल्या शेंबड्या पोराला डायरेक्टर किंवा थेट चेअरमन करणारे अनेक सहकार महAषी महाराष्ट्रात आहेत शंभरपेक्षाही अधिक वAषे टाटा उद्योगसमूह सतत प्रगती का करत राहतो व पंचवीस वAषात बहुतेक साखर कारखाने मोडीत का निघतात? याचे उत्तर या विधानात आहे
१९८१ साली जेआरडी टाटा चेअरमन म्हणून पायउतार झालेत व रतन टाटा त्यांचे वारस झालेत १९९१ साली त्यांनी टाटांच्या सर्व कंपन्यांना टाटा सन्स या एका होल्डींग कंपनीच्या छताखाली आणले १९९१ नंतरच्या मुक्त आAथिक धोरणाचा टाटा उद्योग समूहाने पुरेपूर लाभ घेतला जागतिक स्तरावरील मोठया कंपन्या खरेदी करण्याचा टाटांनी सपाटा लावला पोलाद उत्पादन करणारी अँग्लो डच कंपनी कोरस खरेदी केल्यानंतर टाटांचा जागतिक दबदबा वाढला नंतर इंग्लंडमधील कार उत्पादन करणाÅया जग्वार आणि लॅण्ड रोवर या प्रसिध्द् कंपन्या टाटांनी खरेदी केल्यात टाटा सध्या जागतिक स्तरावरील एक नावाजलेला उद्योगसमूह आहे टाटा समूहाच्या एकूण उत्पादनापैकी ६५ टक्के उत्पन्न परदेशातून येते टाटांची इcडbका ही भारतातील सAवात जास्त खप असणारी गाडी आहे नॅनोमुळे टाटांनी चारचाकी उत्पादनातील जागतिक स्थितीच पालटून टाकली आहे उद्योगविश्वात जागतिक किAती मिळवणाÅया रतन टाटांना जागतिक स्तरावरील अनेक पुरस्कार मिळालेले आहेत अमेरीका, इंग्लंड, थायलंड, अन्ोक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डाॅक्टरेट पदवी बहाल केली आहे २००८ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा किताब प्रदान केला आहे उद्योग विश्वात सतत कार्यरत असणाÅया या "रत्नाला" लग्न करण्यास उसंत मिळाली नाही जागतिक स्तरावर त्यांना वारस शोधण्याचा प्रयत्न चालु आहे आपल्या आजूबाजूला शोधून पहा मिळतो का या नररत्नाला वारसद्य्
No comments:
Post a Comment