Thursday, January 9, 2025

 Vikas Virudha Mahagai by Dr Adik B R , Dt २४ th June २०११

विकास विरूध्द् महागाई

डाॅ  आदिक बी  आर 

२४ जून २०११

भारत व चीन या दोन्ही देशांकडे सध्या एक सारखाच पेच निAमाण झाला आहे आAथिक विकासाचा दर कमी होतोय आणि महागाईचा दर मात्र वाढत आहे  चीन मधील विकासदर मागील वAषी १० टक्के होता, तो ९ टक्के झाला आहे  भारताचाही विकासदर ९ टक्क्‹याहून घसरुन ८ टक्के झालेला आहे  दोन्ही देशांमधील महागाईचा वाAषिक वाढीचा दर ५ टक्क्यांपेक्षाही जास्त आहे  दोन्हीही देशांमध्ये महागाईला आळा घालण्यासाठी व्याजाचे दर वाढविले जात आहेत  व्याजदर वाढीमुळे पैशाची मागणी आणि गुंतवणूक कमी होऊन देशातील महागाईला काही अंशी निमंत्रणच मिळेल  परंतु चलन पुरवठा कमी झाल्यास विकासाचा दरही कमी होईल  देशातील उत्पादन आणि रोजगार वाढीसाठी विकासदर वाढविणे गरजेचे आहे  परंतु विकासदर वाढविण्यासाठी व्याज दरात कपात करून चलन पुरवठा वाढविल्यास महागाई भडकते  विकासदरात वाढ करायची की महागाई नियंत्रणात ठेवायची हाच पेच सध्या भारत व चीनमध्येही आहे 

चीनमधील पेच गेल्या तीस वAषांमध्ये चीनचा विकासाचा दर हा सरासरी १० टक्के राहीला आहे  वाहतूक व दळणवळण क्षेत्रातील वेगवान प्रगती आणि सर्व सवलती बहाल केलेल्या विशेष आAथिक क्षेत्राची निAमीती यामुळे साध्य झालेले आहे  प्राथमिक शिक्षणाचा विस्तार आणि गुणवत्ता वाढ याचाही चीनला फायदा झालेला आहे  प्रचंड आकाराच्या विशेष आAथिक क्षेत्रामध्ये कामगार कायद्याचा अडसर नसल्यामुळे रोजगार निAमीती झाली  परंतु स्वस्तात निAमीती करण्याच्या हव्यासापोटी कामगारांची पिळवणुकही वाढली  चीनने आपल्या चलनाची युआनची डाॅलरसंदAभात किंमत  कमी ठेवून निAयात वाढीला चालना दिली  कमी वेतनावर राबणाÅया कामगारांच्या श्रमातून निAमाण होणाÅया चीनी वस्तू जागतिक बाजारपेठेत धुमाकूळ घालत आहेत  त्यांच्या वस्तूंचा दAजा चांगला नसला तरी त्या स्वस्त असल्याने  गरीब व श्रीमंत देशातही त्यांचा खप चांगला आहे  भारतातही या स्वस्त वस्तूंबद्ल मोठे आकर्षण आहे  स्वस्त चीनी इलेक्ट्रानिक्स खेळण्यांमुळे भारतीय खेळणी उद्योगाचा खेळ खंडोबा झाला आहे हल्ली चीनी दिव्यांची रोषणाई केल्याशिवाय आपल्यकडे दिवाळी साजरी होत नाही  आता पावसाळा आला, पावसाची खात्री नाही, पण चीनच्या छत्र्या मात्र आपल्या बाजारात हमखास येतील 

          चीनचा विकास हा मुख्यतः भांडवल प्रधान उद्योगातील प्रचंड गुंतवणुकीमुळे झालेला आहे  वाहतूक व दळणवळण सुविधा आणि मोठया उद्योगांमध्ये ओतलेल्या प्रचंड पैशामुळे विकास दर आणि भ्रष्टाचारही वाढत गेला  कामगारांचे शोषण चालू ठेवून मोठया उद्योगांमधून प्रचंड उत्पादन घेवून ते जागतिक बाजारपेठेत डंपन केल्याशिवाय चीनची अर्थव्यवस्था तग धरू शकत नाही  विकासाबरोबरच चीनमध्ये चलनपुरवठा व महागाई वाढत आहे  महागाईमुळे गरीब जनता भरडली जात असली तरी त्यांचा आवाज क्षीण असतो  मात्र शहरी मध्यमवAगीयांना महागाईची झळ बसल्यास ते राजकीयदृष्टया घातक असते  म्हणूनच महागाईवर नियंत्रण ठेवणे चीनला आवश्यक वाटू लागले आहे  तेथे हुकूमशाही असली तरी पक्षाला यातून धोका निAमाण होऊ शकतो  म्हणून व्याजदरात वाढ करून महागाई नियcत्रbत करण्याचे धोरण चीनने ठेवले आहे 

भारतातील पेच ः- चीनप्रमाणेच भारतातही विकासदर जास्त ठेवायचा की, महागाई नियंत्रणात आणायची असा पेच आहे  अAथात चीन आणि भारतामधील विकासगाथा आणि राजकीय स्थिती बरीच भिन्न आहे  भारताची अर्थव्यवस्था चीनपेक्षा जास्त बाजाराधिष्ठीत आहे  आणि भारतीय कामगार कायदे अजून बरेच शाबूत आहेत  येथे लोकशाही तग धरून आहे 

          १९९१ नंतरच्या नवीन आAथिक धोरणच्या प्रभावाने उद्योग, व्यापार, वित्त, आणि सेवा क्षेत्रांमध्ये प्रचंड गुंतवणूक वाढली  ३ ते४ टक्के असणारा विकास दर वाढत जावून गेल्या दहा वAषात तो सरासरी ८ टक्के राहिला  उद्योग व सेवा क्षेत्रांच्या विस्ताराबरोबरच दळणवळण क्षेत्रतही मोठी गुंतवणूक झाली  जमिनीबरोबरच सर्व उत्पादन साधनांना मागणी वाढत राहीली  उद्योग व्यवसायांना परवाने आणि त्यांच्या उत्पादनवाढीच्या जोशात मोबदलेही वाढत गेले  वाढते मोबदले आणि सहाव्या वेतन आयोगाच्या जल्लोषात मध्यम वAगीयांनी अनेक वAषे भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष केले  परंतु या सAवांचा परिपाक म्हणून चलनवाढ आणि महागाई वाढत गेली 

          ग्रामीण भागातील शेतकÅयांना किमान आधारभूत किंमती कमी प्रमाणात देवून महागाईवर बराच काळ नियंत्रण ठेवण्यात यश आले  परंतु शेतकरी आणि शेती दोन्हीही गरीबीकडे चालले आहेत  दरिद्री शेती, सतत वाढणाÅया पोटांची भूक आता भागवू शकत नाही  परिणामी कृषी मालाची महागाई वाढत चालली आहे  चीनप्रमाणेच भारतातही शहरी मध्यमवAगीयांना नाराज करणे राजकीयदृष्टया परवडत नाही  म्हणूनच महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदर वाढविण्याचे धोरण स्विकारले आहे 


          आपापल्या परीने सख्खे शेजारी भारत व चीन विकास विरूध्द् महागाईचा पेच सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत  त्यांना त्यात यश मिळो हिच इच्छा         

No comments:

Post a Comment

1 असा आहे अहमदनगर जिल्हा!

 असा आहे अहमदनगर जिल्हा! डाॅ  बारहाते जी  एच दि  २६ जानेवारी २०११ भारतीय द्विपकल्पाच्या उत्तर पश्चिम भागात वसलेला महाराष्ट्र हा प्रामुख्याने...