Satyamche Asatya Prayog by Dr G H Barhate, Dt ११ Jan २००९
'सत्यम'चे असत्य प्रयोग
डाॅ बारहाते जी एच
दि ११ जानेवारी २००९
बुधवार दिनांक ८ डिसेंबर २००८ रोजी भारतातील चौथ्या क्रमांकाची आ टी कंपनी सत्यम काॅम्प्युटर सAव्हिसेस लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष बी रामलिंग राजू यांनी आपल्या पदाचा राजीनामा देतांना कंपनीतील प्रचंड आAथिक घोटाळ्याची कबुली दिली भारतीय 'आयटी' उद्योगक्षेत्रातील आजपर्यंतचा सAवात मोठा घोटाळा उघड झाला अन् संपूर्ण उद्योग विश्व हादरले कंपनीच्या खाते पुस्तकात रोख शिल्लक व बँकेतील जमा रक्कम म्हणून सप्टेंबर २००८ अखेर ५०४० कोटी रुपये व मिळालेले व्याज म्हणून ३७६ कोटी दाखविले आहे, परंतु वास्तवात ही रक्कम अस्तित्वात नाही कंपनीचे वास्तव देणे रक्कम १२३० कोटीचा ताळेबंदात उल्लेखच नाही थोडक्यात 'सत्यम' कंपनी पूर्णतः कफल्लक झालेली आहे आणि देणेकरांचे देणे सोडाच कंपनीला कर्मचा-यांचा जानेवारी २००९ चा प्रगार करणे शक्य नाही! सध्या या कंपनीकडे ५३ हजार कर्मचारी आणि काAयालये शिल्लक आहेत कंपनीचे भवितव्य पूर्णतः अंधारात आहे ५३ हजार कर्मचा-यांची स्थितीकडेलोटाच्या टोकावर असल्यासारखी आहे जागतिक मंदीमुळे आयटी क्षेत्रात रोजगार मिळणे कठीण आहे तसेच बदनाम झालेल्या 'सत्यम' मधील कर्मचा-यांना इतर कंपन्या घेणार नाहीत राजू यांची अनेक संस्थांकडून यथवकाश चौकशी होईल, कोर्टबाजी होईल व ते सुटतील, कारण ते अतिश्रीमंत आहेत सत्यमचे भाग विकत घेणा-या लाखो भागधारकांचे पैसे मात्र बुडाले
राजू यांचा जन्म १५ सप्टेंबर १९५४ रोजी एका सधन द्राक्ष बागायतदार शेतकरी कुटुंबात झाला विजयवाडा येथून बी काॅम झाल्यानंतर अमेरिकेतील ओहिओ विद्यापीठातून त्याने एम बी ए पदवी संपादन केली १९७७ साली भारतात परतल्यानंतर घरची शेती न करता त्याने एक सूतगिरणी सुरु केली दोन-तीन वAषानंतर जास्त नफा कमविण्यासाठी त्याने बांधकाम व्यवसाय सुरु केला १९८० च्या दशकात हैदराबादमध्ये आयटीचा व्यवसाय फुलू लागला बांधकामापेक्षा जास्त पैसा देणा-या आयटी व्यवसायाने राजूला भुरळ घातली १९८७ साली त्याने हैदराबाद येथे 'सत्यम' कंपनी सुरु केली
सत्यम कंपनीचा व्यवसाय अत्यंत चांगल्या प्रकारे चालला टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसीस व विप्रोनंतर चौथ्या क्रमांकाची आयटी कंपनी म्हणून कंपनीने लौकिक प्राप्त केला २००२ व २००८ चा उत्कृष्ट कंपनी व्यवस्थापनाचा पुरस्कारही सत्यमने पटकाविला आहे कंपनीला देशातील तसेच परदेशातील अनेक कंत्राटे मिळाली परदेशातून डाॅलरचा ओघ सतत चालू झाल्यासने राजूमधील अधाशीपणा जागृत झाला परदेशातून मिळणा-या डाॅलर उत्पन्नावर आयकर माफ असल्याने सत्यमची मिळकत प्रचंड प्रमाणात वाढली याच पैशाचा वापर करुन राजूने आणखी काही कंपन्या सुरु केल्या यामध्ये मायतास इन्फ्रा आणि मायतास प्राॅपAटीज या २ रियल इस्टेटमध्ये व्यवहार करणा-या कंपन्यांचा कारभार राजूची मुले पाहतात अजून संपवूर्ण माहिती बाहेर आलेली नाही, परंतु सत्यममधील पैसा या २ कंपन्यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरलेला असावा
हैदराबादच्या आयटी व्यवसायाचा हिरो
हैदराबाद शहराच्या लगत राजू यांनी मायतास कंपनीच्या नावे तब्बल साडेसहा हजार नावे तब्बल साडेसहा हजार एकर जमीन खरेदी केली आहे भारतातील सAवाधिक जमीन असणा-या १० जमीनदारांमध्ये राजूचा क्रमांक लागतो हैदराबादसारख्या अत्यंत वेगाने विकसीत होणा-या महानगरीत हजारो एकर जमीन खरेदी करण्यासाठी राजूला राजकीय व्यक्तिंची मदत घ्यावीच लागली आंध्रप्रदेश काही याबाबत महाराष्ट्रापेक्षा वेगळा नाही आंध्राचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्याशी राजूला अर्थपूर्ण मैत्री करावी लागली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्विंटन हैदराबादला आले असता चंद्राबाबूंनी राजू यांची हैदराबादच्या आयटी व्यवसायाचा हिरो म्हणून त्यांच्याशी ओळख करुन दिली मुख्यमंत्री खिशात असल्याने कंपनीच्या साडेसहा हजार एकर जमिनीव्यतिरिक्त राजू यांनी आपल्या कुटुcबbयांच्या नावे आणखी हजारो एकर जमीन खरेदी केली आंध्रप्रदेशात आयटी या गोंधळामुळे चंद्राबाबू निवडणूक हारले त्यानंतर मुख्यमंत्री झालेत राजशेखर रेड्डी माजी मुख्यमंत्र्यांशी असलेली दोस्ती राजूला महागात पडण्याची शक्यता निAमाण झाली, परंतु भरपूर पैसा असल्यास काहीही शक्य आहे यावर विश्वास असलेल्या राजूने रेड्डीसाहेबांबरोबरही चांगली गट्टी निAमाण केली गरीब शेतक-यांच्या जमिनी हडप करणारी गिधाडे व कसायासम काही राजकारणी एकत्र आल्यास रात्रीतून हजारो एकर जमिनीची खरेदी होऊ शकते केवळ आंध्रप्रदेशातच अशा गोष्टी झाल्या असे नाही महाराष्ट्रातही मुंबई, पुणे परिसरात सेझ व माॅल्ससाठी शेतक-यांना ठगवून हजारो एकर जमिनी हडप केलेल्या आहेत, असो
जमिनीसाठी असलेली राजूची राक्षसी भूक वाढत गेली, ही भूक शमविण्यासाठी सत्यममधील पैशाचा वापर केला गेला राजकीय लोकांबरोबर दोस्ती असल्याने राजूच्या मायतास कंपनीला मोठे हायवे, बंधारे व विमानतळ बांधण्याची कंत्राटी कामे भरपूर प्रमाणात मिळत गेलीत या कामांच्या बदल्यात काही जमिनींचा वाटा राजकीय व्यक्ती व शासकीय अधिका-यांना बहाल केला जाई अलिकडे रियल इस्टेटच्या किंमती कमी होऊ लागल्याने व निवडणुका जवळ आल्याने राजकीय व्यक्तिंकडून जमिनीऐवजी रोख पैशाची मागणी वाढू लागली राजूला रोख पैशाची चणचण निAमाण झाल्याने त्याने सत्यमचे प्रमोटर म्हणून बाळगलेले भाग तारण ठेवून कAजे घ्यावी लागलीत मायतास कंपनीची जमीन विकून कAजाची परतफेड करुन सत्यमचे तारण ठेवलेले भाग पुन्हा ताब्यात येतील अशी राजूची भावना होती, परंतु जमिनीच्या किंमती कमी झाल्याने तसेच एकूणच मंदीमुळे मागणी रोडावल्याने जमिनीचा विक्री व्यवहार होऊ शकला नाही कAजाचे व्याज वेळेवर न मिळाल्याने राजूच्या सावकारांनी सत्यमचे तारण ठेवलेले भाग विक्रीस काढले विक्रीसाठी सत्यमचे भाग बाजारात मोठ्या प्रमाणावर आल्याने भागांची किंमत खाली येण्यास सुरुवात झाली कंपनीकडे भरपूर रोख शिल्लक असल्याने कंपनीने स्वतः भाग खरेदी करुन उतरणीला लागलेल्या किंमती वाढवाव्यात, असे व्यवस्थापनावरील सAवानाच वाटणे स्वाभाविक होते तशी चAचा सुरु झाल्यावर राजूला होकार देणे भागच होते, परंतु पैशाचे नाटक करता येत नव्हते हजारो कोटी रुपयांची रोख शिल्लक केवळ सत्यम कंपनीच्या खाते वहीतच होती, प्रत्यक्षात कंपनीच्या तिजोरीत किंवा बँक खात्यात काहीच नव्हते
सत्यम कंपनीच्या खात्यावर प्रत्यक्षात पैसा नसताना ५०४० कोटी रुपये शिल्लक दाख्विली होती बँकांकडून ठेवींवरील व्याज म्हणून आणखी ३७६ कोटी जमा दाखविली होती ही हिशोबातील बनवेगिरी उघड होऊ नये म्हणून राजूने एक चांगली युक्ती लढविली १६ डिसेंबर २००८ ला सत्यम कंपनीने मायतास कंपनी खरेदी करण्याची घोषणा केली यासाठी सत्यमने ७७०० कोटींची रक्कम खर्च करण्यास तयार असल्याचे जाहीर केले एकदा स्वतःच्या मुलाची मायतास कंपनी ७७०० कोटी रुपयात सत्यमसाठी खरेदी केल्यास त्या कंपनीला ७७०० कोटींचा चेक द्यायचा व प्रत्यक्ष पैशाबाबत नंतर विचार करायचा, असा राजूचा विचार होता शेवटी मामला घरातलाच होता! परंतु सत्यममध्ये मोठ्या प्रमाणावर गुंवणुक केलेल्या संस्थांनी या नियोजित व्यवहारास विरोध केला जागतिक मंदीमुळे आयटी कंपन्यांचा व्यवसाय कमी होत असताना सत्यमने रियल इस्टेट कंपनी खरेदी करणे योग्य नाही, अशी त्यांची रास्त भावना होती या प्रखर विरोधामुळे राजुची केवळ कागदोपत्री असलेल्या संपत्तीचे वास्तवात रुपांतर करण्याची संधी हुकली मायतास कंपनीच्या संभावीत खरेदी वादामुळे सत्यम कंपनीच्या २ स्वतंत्र संचालकांनी राजीनामे दिले आणि राजू यांच्या घोटाळ्याला तोंड फोडले
बुधवार दिनांक ८ जानेवारी २००८ ला राजू यांनी सत्यम कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला व सेबी व कंपनीच्या संचालकांना एक पत्र पाठवून आपल्या गैरकृत्यांची कबुली दिली तात्काळ सत्यम कंपनीच्या भागांची किंमत ९० टक्के कमी झाली सत्यमच्या भागधारकांना राजूच्या जमीन व्यवहाराचा जबरदस्त फटका सहन करावा लागला सत्यम कंपनीच्या ६० देशांमध्ये कार्यरत असलेल्या ५३ हजार कर्मचा-यांचा जीवन टांगणीला लागला
'सत्यम' मधील घोटाळा उघड झाल्याने आधीच खाली घसरलेला भारतीय शेअरबाजार आणखी खाली घसरला या घोटाळ्यामुळे भारतीय उद्योग क्षेत्राची आणि विशेषतः आयटी व बिपीओ क्षेत्राची जागतिक प्रतिमा निश्चितच मलीन झाली आहे अमेरिका व युरोपमध्ये मंदी असतानाही तग धरुन राहिलेल्या भारतीय आटी व बिपीओ उद्योगाला याची झळ बसणारच आहे यामुळे देशाच्या व्यवहारतोलाची स्थिती आणखी नाजूक होणार असल्याचे चित्र आहे
नोव्हेंबर मधील अतिरेक्यांच्या हल्ल्यामुळे आपल्या सुरक्षा यंत्रणेचे कमकुवत दुवे नजरेत आलेत तसेच'सत्यम' च्या भूकंपामुळे औद्योगिक क्षेत्रातील व्यवस्थापन व नियंत्रण व्यवस्थेमधील त्रुटी लक्षात येतील या त्रुटी दूर करण्यासाठी कंपन्यांच्या व्यवस्थापनात काही मूलभूत बदल करणे क्रमप्राप्त होईल 'सत्यम'सारखी उत्कृष्ट आयटी कंपनी तिच्या सहयोगी मायतास कंपनीच्या जमीन खरेदी व्यवहारांमुळे अडचणीत आली आहे राजू यांच्या जमीन खरेदीच्या प्रचंड भुकेमुळेच हे घडले आहे तेव्हा प्रमुख व सहयोगी कंपन्यांच्या संबंधाबद्दल येथून पुढे जागरुक राहिले पाहिजे तसेच कंपन्यांमधील अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्त अधिकारी, तज्ज्ञ संचालक, इतर संचालक, अन्य घटकांची जबाबदारी व व्यावसायिक नैतिकतेची जाणीव उंचविण्याची गरज आहे असे घोटाळे होऊ नयेत म्हणून संपूर्ण संचालक मंडळावर आAथिक जबाबदारीबाबत बंधने कडक करावी लागतील
भारतीय कंपन्यांवर केंद्रीय उद्योग खाते, कंपनी निबंधक व सेबीमार्फत विविध कायद्यांद्वारे नियंत्रण होत असते कायद्यांची किंवा नियंत्रण संस्थांची कमतरता नाही, तर मुख्य प्रश्न अंमलबजावणीचा आहे 'सत्यम' कंपनीच्या ताळेबंदात उत्पन्न व नफा फुगवून दाखविण्याचा प्रयोग गेली अनेक वAषापासून चालू होता यामुळे कंपनीच्या अंतर्गत व बाह्य आॅडिट करणा-या संस्था काय करत होत्या? हा प्रश्नच आहे यामुळे आॅडिट करणा-या संस्थांवर देखेख करणारी स्वतंत्र संस्थाच निAमाण करणे गरजेचे झाले आहे
'सत्यम' च्या असत्याच्या प्रयोगामुळे भारतीय कंपनी व्यवस्थापन व नियंत्रण यंत्रणेत बहाल करण्यास कमी अधिक कालखंड लागू शकेल, परंतु आजच्या घडीला 'सत्यम' मधील आग विझवणे जास्त गरजेचे आहे या ठिकाणी केंद्र सरकारची भूमिका जास्त महत्वाची ठरणार आहे सत्यम कंपनी व ५३ हजार कामगारांचे भवितव्य अडचणीत येणार नाही हे तातडीने पाहिले पाहिजे यासाठी अमेरिकेप्रमाणे आAथिक पॅकेज देता येईल 'सत्यम' जितक्या लवकर स्थिर होईल तेवढी भारतीय उद्योगांची जागतिक प्रतिमा पुन्हा उंचावेल आपल्याशी आयटी व बिपीओबाबत स्पAधा करणा-या चिनी व इतर कंपन्यांना भारतीय कंपन्याबाबत जगात गैरविश्वास निAमाण करणे शक्य होणार नाही हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे
आता 'सत्यम' चे असत्याचे प्रयोग संपले आहेत, परंतु भारत सरकार, सेबी व सत्यममधील सर्व कर्मचा-यांनी ऐकीचा उच्च व्यावसायिक नैतिकतेचा व सत्याचा प्रयोग करुन राजू जरी चुकला असला तरी 'सत्यम' सत्यमच आहे, हे जगाला दाखवून द्यावे!
No comments:
Post a Comment