Aarthik Vanava by Dr Adik B K , Dt १५ August २०११
आAथिक वणवा
डाॅ आदिक बी आर
दि १५ आॅगस्ट २०११
स्टाणर्ड ॲण्ड पोर्स या जागतिक किAतीच्या पतमानांकन संस्थेने अमेरिकन सरकारचा पतदAजा AAA वरून AA+ असा खाली खेचला आणि आAथिक वणव्याला सुरूवात झाली अमेरिकेतील डाऊ जोन्स आणि नास्कॅड या शेअर बाजारातील निAदेशांकात प्रचंड घसरण झाली शेअर बाजार घसरणीचा वणवा युरोपनंतर जगभर पसरला जागतिकीकरणामुळे सर्व राष्टे्र व्यापार आणि आणि गुंतवणूकीमुळे जोडलेली आहेत माहिती तंत्रज्ञानाने संपूर्ण जगच एक खेडे झाले आहे जगाच्या कानाकोपÅयात झालेली घटना टी व्ही इंटरनेटव्दारे क्षणात जगभर माहित होते त्या घटनेचे चांगले वाईट पडसाद जगभर पोहोचतात अमेरिकेत सुरू झालेली शेअर बाजाराची घसरण काही दिवसांत जगभर पसरली भारतातील शेअरबाजारही घसरले जगातील अनेक गुंतवणूकदारांनी शेअरमधील गुंतवणूक कमी करून सोने खरेदीकडे पैसे वळवल्याने सोन्याचे भाव सर्वत्र वाढत आहेत अमेरिकेत हा वणवा का सुरू झाला आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर संभाव्य परिणाम काय होतील या बाबतचा हा फेरफटका
पहिल्या महायुध्दपर्यंत जागतिक महासत्तेचे पद निAविवादपणे इंग्लंडकडे होते औद्योगिकदृष्टया संपन्न असलेला इंग्लंड निम्म्या जगावर राज्य करत होता राजकीय सत्ता आणि व्यापारांच्या माध्यमातून जगातील संपत्ती इंग्लंडकडे ओघानेच जात होती पहिल्या महायुध्दापासून दुसÅया महायुध्दापर्यंत जागतिक महासत्ता म्हणून इंग्लंडचे स्थान अमेरिकेने पटकाविले दुसÅया महायुध्दापासून १९९० पर्यंत अमेरिका व रशियामध्ये जागतिक महासत्तेच्या पदासाठी सतत शितयुध्द चालू राहिले आAथिक अरिष्टाच्या दबावामुळे १९९० मध्ये रशियाचे अनेक तुकडे झाले व अमेरिका एकमेव महासत्ता म्हणून मिरवू लागला महासत्तेचे हे पद टिकविण्यासाठी अमेरिकेने केलेल्या अनेक गोष्टींमुळे त्यांचे आAथिक स्थैर्य धोक्यात आले १९८० नंतर शिथीलीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचे विचार जगभर पसरले अनेक देशांमध्ये खाजगी उद्योग व्यवसायांवरील शासकीय बंधने कमी होत गेलीत खाजगीकरणाच्या लाटेला शासकीय पाठींबा व सर्व प्रकारची मदत मिळू लागली १ जानेवारी १९९५ मध्ये स्थापन झालेल्या जागतिक व्यापार संघटनेमुळे खुल्या व मुक्त आAथिक व्यवहारांना गती मिळू लागली याचा परिणाम म्हणून जागतिक आAथिक संतुलनात झपाटयाने बदल होत आहेत
अमेरिकेने बौध्दिक संपदा आणि ताcत्रbक प्रगतीच्या जोरावर मिळविलेल्या अव्वल स्थानाला आता चीनच्या उदयाने स्पAधा निAमाण झाली आहे सतत चालणारे संशोधन व त्यातून निAमाण होणारे शोध व अभिनव वस्तू जागतिक बाजारपेठेत अमेरिका विकत होती अमेरिकन कंपन्यांना मोठया प्रमाणावर नफा मिळत होता यातून अमेरिकेची समृध्द्ी वाढत गेली परंतू गेल्या दहा वAषापासून चीन, रशिया, ब्राझील, कोरिया व भारतासह अनेक देश संशोधन व नविन उत्पादनांबाबत अमेरिकेशी चांगली स्पAधा करत आहेत आज अमेरिकेच्या बाजारपेठांमध्ये चिनी वस्तूंनी धुमाकूळ घातलेला आहे अत्यंत स्वस्तात मिळणाÅया चिनी वस्तुंमुळे अमेरिकन ग्राहक स्वतःच्या देशातील महाग वस्तुंकडे पाठ फिरवत आहे उत्पादन क्षेत्रात पिछेहाट होत असल्याने अमेरिकन अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचे प्राबल्य वाढत गेले २००८ सालच्या अरिष्टांमुळे अमेरिकेचे वित्तीय क्षेत्र हादरून गेले अनेक मोठ्या वित्तीय संस्था व बँका दिवाळखोरीत गेल्या अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत लोटली गेली व ती अजूनही सावरू शकली नाही
अमेरिकेतील खाजगी व मुक्त बँकbंग व्यवसायाने जनतेला कAजे घेण्याचे प्रचंड व्यसन लावले पंधरा वAषावरील प्रत्येक नागरिकांकडे डझनभर क्रेडीट किंवा डेबीट काAडे आहेत अनावश्यक खरेदी व चंगळवादाची सवय झाल्यने बचत करण्याची सवयच बंद झाली नागरिक व देश कAजाच्या डोंगराखाली दडपला गेला अमेरिकन शासनाचे कर्ज स्थुल राष्ट्रीय उत्पादनाच्या ९१ टक्के झाले आहे शासनाने घ्यावयाच्या कAजाच्या मAयादेत वाढ करण्यासाठी बराक ओबामा सरकारला त्यांच्या सिनेटमध्ये खूप प्रयत्न करावे लागलेत मुख्यतः या घटनेमुळेच स्टाणर्ड ॲण्ड पोर्स संस्थेने अमेरिकेचा पतदAजा कमी केला आहे याचे पडसाद अमेरिकेबरोबरच जगभर जाणवत आहेत
अमेरिकेच्या महासत्ता पदाला घरघर सुरू झालेली आहे युरोपमधील अनेक देशांमध्ये कर्जबाजारीपणाचे प्रश्न अत्यंत तीव्र झालेली आहेत पोAतूगाल, आयर्लंड, ग्रीस आणि स्पेन हे देश आAथिक मदतीशिवाय या प्रश्नातून बाहेर पडणार नाही अमेरिकेसह युरोपमध्ये मंदी व बेकारीचा प्रश्न अत्यंत स्फोटक झालेला आहे आAथिक प्रश्नामुळे तेथील सामाजिक स्थैAयाला धोका निAमाण झालेला आहे इंग्लंडमधील लुटालुट व दंगल हे याचेच परिणाम आहेत
अमेरिका व युरोपमधील आAथिक आरिष्टांचा भारतावर काय परिणाम होणार हा कळीचा मुा आहे याचे काही चांगले तर काही वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील अमेरिका व युरोपमध्ये होणारी आपली वस्तू व सेवांची निAयात कमी होऊन उत्पन्न व रोजगारावर विपरीत परिणाम होणारच परंतु आपण आAथिक डावपेचाचा भाग म्हणून त्यांची बलस्थाने काबीज केल्यास अल्पकाळात आAथिकदृष्ट्या प्रगत होऊ शकतो परंतू यासाठी भ्रष्टाचार व पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आपल्या नेत्यांनी आAथिक प्रगतीकडे चांगले लक्ष दिले पाहिजे वीज, वाहतूक, शिक्षण व मनुष्यबळ विकासाकडे लक्ष देऊन कृषी, औद्योगिक व सेवा विकास केला पहिजे आज जागतिक महासत्ता म्हणून अमेरिका जे स्थान लवरकच रिक्त करणार आहे त्यावर भारताला विराजमान होण्याची हीच संधी आहे
No comments:
Post a Comment