Thursday, January 9, 2025

 Challananche Yuddha by Dr Adik B R , Dt ०४th Nove  २०१०

चलनांचे युध्द

डाॅ  आदिक बी  आर 

०४ नोव्हेंबर  २०१०

दोन किंवा अनेक देशांमधील प्रत्यक्ष युध्द किंवा शीतयुध्द सAवांनाच परिचित आहे; परंतु आंतरराष्ट्रीय व्यापारात चालनारे चलनांचे युध्द अनेकांना फारसे माहित नसते  सध्या जागतिक मंचावर अमेरिका व चीन या दोन बलाढ्य देशांमध्ये चलनांचे युध्द चांगलेच पेटले आहे  सेडल येथे होणाÅया जी-२० संमेलनात अमेरिका चीनच्या विरोधात भूमिका मांडणार असल्याने या प्रश्नाला जागतिक परिणाम प्राप्त होणार आहे  म्हणूनच चलनांचे युध्द म्हणजे काय ? अमेरिका व चीन यांच्यामध्ये हे युध्द का होत आहे ? अमेरिका व चीनच्या या अंर्तगत प्रश्नाला जागतिक स्वरूप का प्रात्प होत आहे ? या प्रश्नामुळे भारतावर काय परिणाम होत आहे व भारताची भूमिका कशी असावी ? अशा अनेक बाबींबद्ल माहिती असणे आवश्यक आहे  याबाबतचा हा लेख 


चलनाचे युध्द - देशांतर्गत वस्तू व सेवांचा व्यापार सतत होत असतो  या व्यापारात वस्तू व सेवांचा व्यापार सतत होत असतो  या व्यापारात वस्तू व सेवांच्या खरेदी - विक्री व्यवहारासाठी मान्यताप्राप्त चलन वापरले जाते  भारतात रूपया या चलनाच्या साहाय्याने खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार पार पाडतात, परंतु भारतीयांना जेव्हा परदेशातील वस्तू किंवा सेवा खरेदी करावयाच्या असतात तेव्हा रूपयांऐवजी डाॅलर या चलनाचा वापर करावा लागतो  म्हणजे पहिल्यांदा रुपयांचे डाॅलरमध्ये रूपांतर करावे लागते  सध्या ४४ रूपयाला १ डाॅलर असा दर आहे  गेल्या दोन वAषापासून भारतीय रिझर्व बँकेने रुपया डाॅलरचा दर स्थिर ठेवण्याचे धोरण सोडून दिले आहे  सध्या हा दर बाजार यंत्रणेव्दारे मागणी पुरवठयाच्या संतुलनानुसार ठरत असतो  सध्या भारतात गुंतवणूक करण्याच्या हेतूने युरोप, अमेरिकेतून डाॅलर ओतले जात आहेत  यामुळे डाॅलर रूपयाच्या तुलनेत स्वस्त होत आहेत  याचा परिणाम म्हणूनच एलसीडी टीव्ही व इतर इलेक्ट्रानिक वस्तू स्वस्तात मिळत आहेत  कारण या वस्तुंमधील महत्वाचे सुटे भाग आयात करावे लागतात  डाॅलर स्वस्त झाल्याने आयात करणे स्वस्त होते, परंतु निAयात करणे अवघड होते  कारण परकियांना भारतीय वस्तू महाग मिळू लागतात  म्हणूनच स्वस्त होणारा डाॅलर भारतीय निAयातदारांना तापदायक ठरतो 

आपल्या देशातून जास्तीत जास्त वस्तू व सेवांची निAयात व्हावी ही प्रत्येक देशाची इच्छा असते  निAयात वाढीतून उत्पादन रोजगार व उत्पन्न वाढीला चालना मिळत असते  निAयात वाढीसाठी वस्तू व सेवांची गुणवत्ता उत्तम असणे आणि किंमत स्वस्त ठेवणे गरजेचे असते  आंतरराष्ट्रीय व्यापारात चलन म्हणून मुख्यतः डाॅलरचा उपयोग केला जातो  यामुळे डाॅलरच्या तुलनेत आपले चलन स्वस्त ठेवण्याचे धोरण चीनसह अनेक विकसनशिल राष्ट्रे राबवित असतात 

चीन- अमेरिकेचे चलनी युध्द्- गेल्या वीस वAषापासून जागतिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने चीन चिकाटीने प्रयत्न करत आहे  चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणूक करून घेण्यात ते यशस्वीही झालेले आहेत  चीनमध्ये उत्पादित झालेल्या वस्तू अमेरिका, युरोप, व इतर देशांमध्ये मोठया प्रमाणावर निAयात केल्या जातात  चीनची उत्पादने गुणवत्तेबाबत जपानसारखी प्रसिध्द् नाहीत  परंतु चीनी वस्तु अत्यंत स्वस्त असतात  मोठ्या प्रमाणावर उत्पादन व कामगारांचे शोषण तसेच डाॅलरच्या तुलनेत स्वस्त युआन यामुळे निAयात वस्तू ठेवणे चीनला शक्य झाले आहे 

२००८ मधील वित्तीय पेचामुळे अमेरिकेत अर्थव्यवस्थेत अनेक गंभीर प्रश्न निAमाण झाले आहेत  अनेक कंपन्या आणि वित्तीय संस्था बंद पडल्याने बेकारीचा दर वाढलेला आहे  नवीन वस्तुंचा शोध लावून त्या जगभर पाठविण्याचा अमेरिकेचा जुना लौकिक आता राहिलेला नाही  चीन, कोरिया, ब्राझील व इतर देशांनी नव्या उत्पादनाबाबत अमेरिकेच्या पुढे आहेत  वित्तीय उलाढाल करणाÅया अमेरिकेतील अजस्त्र संस्था बदनाम झाल्यात किंवा बंद पडल्या आहेत  गेल्या वीस वAषात निAयातीबाबतचे अमेरिकेचे वर्चस्व कमी होत आहे  अमेरिकेने चीनमधील स्वस्त वस्तुंनी धुमाकुळ घातलेला आहे  निAयातवाढीमुळे चीनमधील उत्पादन रोजगार व उत्पन्न वाढत आहे  परंतु अमेरिकेमधील बेकारीचा प्रश्न गंभीर होत आहे  बेकारी कमी करण्याच्या दृष्टीने उत्पादन वाढीसाठी अमेरिकेने अत्यंत स्वस्त व्याजाचे धोरण स्विकारलेले आहे  परंतु स्वस्तात मिळणारे भांडवल प्रत्यक्ष उत्पादनवाढीसाठी न वापरता भारतासारख्या विकसनशील देशांमधील शेअरबाजारामध्ये ओतले जात आहे 

उत्पादन क्षेत्रातील स्थितीशीलता व वाढती बेकारी यामुळे ओबामा सरकार अत्यंत त्रस्त आहे  यामुळे युआन स्वस्त ठेवण्याच्या चिनी धोरणाविरूध्द् अमेरिका जोरदार प्रचार करत आहे  नुकत्याच सेऊल येथे झालेल्या जी -२० च्या बैठकीतही हा मु­ा उपस्थित केला गेला  चीनने आपण होऊन युआनची डाॅलरमधील किंमत वाढवावी, असे अमेरिकेला वाटते  यामुळे स्वस्त चीनी वस्तूंचा अमेरिकेतील सुळसुळाट कमी होईल व अमेरिकन उद्योगांना संधी मिळेल  परंतु चीन मात्र या गोष्टीला संमती देत नाही  खरे तर हा प्रश्न चीन व अमेरिकेचा अंतर्गत प्रश्न आहे; परंतु त्याला जागतिक स्वरूप देण्याचा अमेरिकेचा डाव आहे 


भारताची भूमिका - गेल्या दोन वAषांपासून भारताने रुपया - डाॅलरचा दर अनियंत्रीत केला आहे  त्यापुAवी आपणही चीनप्रमाणे निAयातवाढीसाठी रुपया स्वस्त ठेवण्याचे धोरण दीर्घकाळ राबविले आहे  सध्या आपण तसे करत नसल्याने चीनविरुध्द् ओरडता येईल  परंतु चीनबरोबरील आपले संबंध चांगले ठेवण्याच्या दृष्टीने शांत राहणे जास्त सोयीस्कर ठरेल  अमेरिकेतील स्वस्त डाॅलर धोरणामुळे भारतातील गुंतवणूक वाढणे हे आपल्या दृष्टीने लाभदायक ठरु शकेल  फक्त हा पैसा योग्य त्या क्षेत्रामध्ये गुंतविला गेला पाहीजे  चीन अमेरिकेच्या चलनी युध्दात आपला लाभ कसा होईल, हे पाहणेच भारताच्या दृष्टीने योग्य होईल 

No comments:

Post a Comment

1 असा आहे अहमदनगर जिल्हा!

 असा आहे अहमदनगर जिल्हा! डाॅ  बारहाते जी  एच दि  २६ जानेवारी २०११ भारतीय द्विपकल्पाच्या उत्तर पश्चिम भागात वसलेला महाराष्ट्र हा प्रामुख्याने...