Rikami Pott by Dr Adik B R , Dt २५th October २०१०
रिकामी पोटं
डाॅ आदिक बी आर
२५ आॅक्टोबर २०१०
आAथिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणाÅया भारतात ३७ कोटी लोक दारिद्र्यरेषेखालील जीवन जगतात देशातील २० टक्के म्हणजेच २३ कोटी लोक कुपोषित आहेत देशातील दारिद्र्य नेमके कसे मोजावे? याबाबत तज्ञांमध्ये मतभेद आहेत माणसाला साजेल असे किमान जीवनमान जगण्यासाठी काही आवश्यक गरजा पूर्ण होणे आवश्यक असते अन्न, वस्त्र, पाणी, निवारा, शिक्षण, मनोरंजन आदी किमान आवश्यक बाबींवर खर्च करण्याइतकेही ज्यांचे उत्पन्न नाही ते दारीद्रय रेषेखालील आहेत असे म्हणता येईल परंतु या प्रत्येक बाबींबाबत किमान आवश्यक पातळी नेमकी किती असावी याबाबत मतभेद आहेत शिवाय काळानुसार किंमत वाढीमुळे आवश्यक किमान खर्च पातळी वाढत जाणार म्हणून दारिद्रय मोजण्यासाठी किमान आवश्यक उष्णांकाची मदत घेतली जाते
भारतात सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी ग्रामीण भागात २४०० व शहरी भागात २१०० वॅŠलरीज उष्णांकाची गरज असते किमान उष्मांक मिळेल एवढे अन्न घेऊ न शकणारे लोक दारिद्रय रेषेखाली आहेत, असे मानले जाते भारतात अशा दरिद्री लोकांची संख्या ३७ कोटी आहे किमान आवश्यक वस्त्र, शिक्षण व निवाÅयाचा विचार केला तर हा आकडा खूप मोठा होईल भारतातील १४ टक्के म्हणजे १६ कोटी लोकांना दुषित पाणी प्यावे लागते देशातील ३३ टक्के म्हणजे ३८ कोटी लोक गलिच्छ निवाÅयात जगतात देशातील ४० टक्के म्हणजे ५३ कोटी लोांना अत्यावश्यक औषधे खरेदी करण्याची ऐपत नाही गटारांच्याकडेला गुदमरलेल्या झोपड्यात राहणाÅया या लोकांना उकिरडयावरील अन्नासाठी कुत्रे व डुकरांबरोबर स्पAधा करावी लागते रिकाम्या पोटांची समस्या आपल्या देशात पुरातन अशी आहे लेकुरे उदंड झाली, अन्न ,खाया मिळेना असे तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेले आहे स्वातंत्र्य मिळून ६० वAषे होऊन गेलीत, परंतु आजही अर्धभरल्या पोटाची समस्या संपलेली नाही या देशातील सामान्य माणसाला सत्ता, संपत्ती, किंवा प्रतिष्ठा नकोय त्यांना कोरभर भाकर हवीय करपून गेलेल्या आतड्यात साधी माती भरायला महाग असणारी ही माणसं पोटासाठी पोटचा गोळा विकत असतात दोन पैशांसाठी पोटचे मूल किंवा देहविक्रीसाठी मुलगी विकणाÅया अभागी लोकांच्या बातम्या येतात त्या निAजीवपणे आपण वाचतो आपल्या संवेदना हरवल्या आहेत आपल्यातील मनुष्यत्व लोपले आहे आपण पशु झालो आहोत याची आपल्याला कल्पना नसते, ना त्या बदद्ल खंत असते
जागतिक स्तरावर मान्यता असणाÅया एका संस्थेचा जागतिक दारिद्रयाबाबतचा एक अहवाल नुकताच प्रसिध्द् झाला आहे दारिद्रयानुसार क्रमवारी केलेल्या ८४ देशांच्या यादीत भारताचा क्रमांक ६८ वा आहे आपल्या शेजारील श्रीलंका व पाकिस्तान आपल्यापेक्षा वरच्या स्थानावर आहे या संशोधन संस्थेने दारिद्रय मोजतांना पुढील तीन बाबींचा विचार केलेला आहे १) एकूण लोकसंख्येतील कुपोषितांचे प्रमाण २) पाच वAषाच्या आतील प्रमाणित वजनापेक्षा कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण, आणि ३) पाच वAषांच्या आतील बालकांचा मृत्युदर या तीनही निAदेशंकांमध्ये भारताची स्थिती दयनीय आहे देशात २० टक्के म्हणजे २३ कोटी लोक कुपोषित आहेत देशातील पाच वAषाच्या आतील बालकांपैकी ४३ टक्के बालके कमी वजनाची आहेत आणि अशा बालकांचा दर हजारी मृत्युदर ९३ आहे जगात वAषाला जन्माला येणाÅया एकूण बालकांपैकी १९ टक्के बालके भारतात जन्मतात जगातील प्रमाणित वजनापेक्षा कमी वजनाच्या बालकांपैकी ४२ टक्के बालके भारतातील असतात जगातील सAवाधिक तरूण भारतात असतील या स्थितीचा आAथिक विकासासाठी आपण फायदा घेणार आहोत परंतु बालपणी हे तरूण कुपोषित असतील अर्धशिक्षीत असतील तर ते सक्षमपणे राष्ट्रउभारणी करू शकणार नाहीत देशातील तरूण कामकरी लोकसंख्येवरच देशाचे भवितव्य अवलंबुन असते
देशातील गरिबांना स्वस्त दराने धान्य देऊन हा भुकेचा प्रश्न पूर्णपणे सुटणार नाही हात रिकामे राहिल्यानेच पोटे रिकामी राहत असतात एम एस स्वामीनाथन संशोधन संस्थेने अलीकडे एक रिपोर्ट प्रसिध्द् केलेला आहे त्यामध्ये शहरी भागात धान्याची व स्वस्त धान्याची मुबलकपणे उपलब्धता असूनही त्याला उठाव नसल्याचे स्पष्ट केलेले आहे शहरी भागातील अनेक गरिबांना बारमाही काम व शाश्वत उत्पन्न नसल्याने त्यांची खरेदी शक्ती कमी राहते कुपोषित लोकांची कार्यक्षमता कमी असल्याने त्यांना वेतनही कमी मिळते वेतन कमी म्हणून कुपोषण आणि कुपोषण म्हणूनच कार्यक्षमता व वेतन कमी असे दारिद्रयाचे दृष्टचक्र चालूच राहते शहरी गरिबांसाठी रोजगार हमी योजना असणे गरजेचे आहे त्यांचा राहणीमानाचा दAजा सुधारणेदेखील गरजेचे आहे अन्नधान्य वितरणाची योजना भ्रष्टाचारमुक्त केलीच पाहीजे केंद्र व राज्य सरकारांच्या दारिद्रय निAमुलनाच्या सर्व योजनादेखील व्यवस्थितपणे राबविल्या पाहिजेत, असे झाले नाही तर लवकरच एक दिवस ही रिकामी पोटे आपल्या व्यवस्थेसह आपल्याला गिळून टाकतील यात शंकाच नाही
No comments:
Post a Comment