Thursday, January 9, 2025

 Aarthik Patrakarita by Dr Adik B R , Dt २९th Nov  २०१०

आAथिक पत्रकारिता

डाॅ  आदिक बी  आर 

२९ नोव्हेंबर २०१०

आपल्या दैनcदbन जीवनात घडणाÅया घटना राजकारण, गुन्हेगारी, अर्थकारण, कला, क्रीडा, करमणूक, अपघात, चमत्कारिक घटना, नैसAगिक आपत्ती, जीवितहानी, वित्तहानी, शोध, अनैतिक घटना, दुःखद घटना, सभा, समारंभ अशा विविध बाबींब­ल ताज्या घडामोडी वाचकांना माहित करुन देणे हा पत्रकारीतेचा सर्वप्रथम जबाबदारीचा भाग असतो  ताज्या घटनांब­ल वस्तुनिष्ठ माहीती देणे हे पत्रकारितेचे प्रथम कर्तव्य असते  यानंतर या ताज्या घटनांच्या पाठीमागे कोणती कारणे आहेत व भविष्यात अशा घटना घडतील का? याबाबतचा अंदाज करणे हे देखील पत्रकारितेचेच कार्य मानावे लागेल  यापुढे जाऊन घडणाÅया घटनांब­ल चांगली समीक्षा करुन व्यापक समाजहिताच्या दृष्टीने योग्य असे कोणते बदल करावे लागतील, याचे मार्गदर्शन करणे हे पत्रकारितेचे सAवोच्च कार्य म्हणावे लागेल 

समाजामध्ये दररोज असंख्य घटना घडत असतात  या घटना राजकीय, सामाजिक,

आणि आAथिक स्वरुपाच्या असतात  जीवनाच्या आAथिक अंगाबाबत माहिती आAथिक पत्रकारितेमुळे मिळत असते  आAथिक घडामोडींबाबत वाAतांकन व त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे या आAथिक घडामोडींचे विश्लेषण व सAवात महत्वाचे म्हणजे परिक्षण करून व्यापक समाजहिताच्या दृष्टीने योग्य आAथिक निर्णय घेण्याबाबत मार्गदर्शन हे आAथिक पत्रकारितेचे आद्यकर्तव्य असते 

                   कोणाच्याही व्यक्तिगत किंवा कौटुcबbक जीवनात आAथिक गोष्टी महत्वाच्याच असतात  दिवसातील जास्तीत जास्त वेळ व्यक्ती उत्पन्न मिळविणे ते खर्च करणे, त्यासाठीच करत असते  कोणत्याही कुटूंबात किंवा समाजात भांडणे किंवा कलह असतील तर ते मुख्यतः आAथिक कारणांसाठीच असतात  समाजातील कोणत्याही दोन गटात किंवा जगातील कोणत्याही दोन देशात लढाई किंवा युध्द् होत असेल तर त्यामागेही मुख्यतः आAथिक कारण असते  त्यामुळे समाज जीवनाचे आAथिक अंग समजावून घेणे अत्यंत महत्वाचे असते  हे अवघड काम करण्याची जबाबदारी आAथिक पत्रकारितेवर असते 

आजचे आAथिक जीवन अत्यंत गुंतागुंतीचे झालेले आहे  जागतिकीकरणामूळे स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय, व आंतरराष्ट्रीय पातळीवरील घटनांचा संबंध अत्यंत घनिष्ठ झालेला आहे  जगाच्या इतर देशांमधील आAथिक घटना व निर्णयाचे परिणाम तात्काळ आपल्या अर्थव्यवस्थेवर होत असतात  सर्व आAथिक घडामोडी, त्यांचे परिणाम, त्यामागील कारणे व त्याचे आपल्या समाजाच्या आAथिक जीवनावर होणाÅया परिणामांची माहिती वाचकांना सोप्या पध्द्तीने समजावून देण्याचे कार्य आAथिक पत्रकारितेमध्ये करावे लागते 

भारतात प्रसिध्द् झालेले पहिले वृत्तपत्रच आAथिक विषयाला वाहिलेले होते  जेम्स हिकी यांनी १७८० साली बंगाल गॅझेट आॅफ कलकत्ता जनरल ॲडव्हAटायझर हे वृत्तपत्र व्यापारी सूचना व जाहिराती देण्यासाठी सुरू केले  २० व्या शतकाच्या सुरूवातीपासून मुंबई, कलकत्ता व मद्रास या शहरांमधून आAथिक पत्रकारितेची  जोमदारपणे सुरूवात झाली  १९२८ पासून कलकत्त्याहून इcडbयन फायनान्स  १९४३ पासून दिल्लीहून इस्टर्न इकाॅनाॅमी व १९६१ पासून मुंबईहून इकाॅनामिक टाईम्स हे प्रमुख वृत्तपत्र सुरू झालीत  आज या प्रमुख वृत्तपत्रांबरोबरच अनेक साप्ताहिके, मासिके व इतर दैनिकांमधून उत्कृष्ट आAथिक पत्रकारिता प्रकाशित होत असते 

मराठीत आAथिक विषयाला पूर्णतः वाहिलेले एकही वर्तमानपत्र नाही  मराठी माणूस हा आAथिक व्यवहारांबाबत तितकासा गंभीर नसतो  उद्योग, व्यापार, व्यवसाय, शेअरबाजार, व एकूणच आAथिक क्षेत्रात मराठी माणसे फारशी चमकत नाहीत  यामुळे पूर्णतः आAथिक घडामोडींबाबत एकही दैनिक नाही  तसे अनेक नियतकांमधून मराठीत आAथिक घडामोडी दिलेल्या असतात 

आज अनेक मराठी वर्तमानपत्रतून आAथिक पत्रकारितेला महत्व दिल्याचे जाणवते  मराठीतील प्रमुख दैनिकांतून आAथिक घडामोडींबाबत माहिती विश्लेषण व धोरणात्मक बाबी सविस्तरपणे मांडल्या जातात  वृत्तपत्रातून आAथिक पत्रकारिता चांगली बहरत आहे 

दै  सार्वमतमधून मी स्वतः दोन दशकांपासून केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत व प्रमुख घडामोडींबाबत नियमितपणे लिखाण करत आहे  संपादक नंदकुमार सोनार यांना आAथिक बाबींसाठी एक स्वतंत्र पान देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला  सार्वमतमधील सर्व घटकांना महत्वाच्या आAथिक संकल्पना माहित होण्यासाठी त्यांनी विशेष प्रशिक्षण वर्ग आयोजित केले होते  त्या वAगामध्ये मीही सामील होतोच  अर्थकारणाला महत्व दिल्याने दै  सार्वमतचे सामाजिक मूल्य वाढले आहे 


आज आंतरराष्ट्रीय स्तरापासून स्थानिक पातळीपर्यंत अनेक प्रश्न आहेत  शेतमालाचे भाव, कृषी उत्पादनाच्या किंमती, "आदर्श" सारखे आAथिक घोटाळे, भ्रष्टाचार, ठेवी बुडविणाÅया पतसंस्था, आणि बँका सभासदांना गंडा घालणारे कारखाने अशा अनेक बाबींचा अभयास करून त्यात सुधारणा करण्यासाठी आAथिक पत्रकारितेची गरज आहे 

No comments:

Post a Comment

1 असा आहे अहमदनगर जिल्हा!

 असा आहे अहमदनगर जिल्हा! डाॅ  बारहाते जी  एच दि  २६ जानेवारी २०११ भारतीय द्विपकल्पाच्या उत्तर पश्चिम भागात वसलेला महाराष्ट्र हा प्रामुख्याने...