Hatavarli Pott by Dr Adik B R , Dt १९th July २०११
हातावरली पोटं
डाॅ आदिक बी आर
१९ जुलै २०११
भारताची प्रगती होत आहे आणि गेल्या दहा वAषापासून आणखी वेगाने होत आहे यात मुळीच शंका नाही परंतु या प्रगतीच्या चंद्रावर मोठा काळा डाग आहे एकूण ५० कोटी कामगारांपैकी ४० कोटी कामगार असंघटीत क्षेत्रात आहे शेती, उद्योग व सेवा या सर्व क्षेत्रांमध्ये हे कामगार मोठया प्रमाणात आहे व त्यांची संख्या दिवसोिंदवस वाढत आहे हातावर जगणारी ही माणस देशाच्या उत्पादनाला मोठा हातभार लावतात परंतु त्यांची स्थिती मात्र हलाखीची आहे यांच्यासाठी नियमीत वेतन आयोग नेमले जात नाही किंवा त्यांची गांAभीयाने दखलही घेतली जात नाही हातावर जगणाÅया व आवाज नसणाÅया लोकांवरच हा फेरफटका द्य्
असंघटीत क्षेत्र व असंघटीत कामगारांचा अभयास करण्यासाठी २००७ मध्ये एक राष्ट्रीय आयोग नेमलेला होता या आयोगाने दहापेक्षा कमी कामगारांच्या मदतीने वस्तु किंवा सेवांचे उत्पादन करणाÅया व कोणत्याही स्वरूपाच्या उद्योग व्यवसायाला असंघटीत क्षेत्र म्हटले आहे अशा क्षेत्रांमध्ये काम करणारे व कोणत्याही स्वरूपाची सामाजिक सुरक्षा योजनेचे संरक्षण नसणारे कामगार म्हणजेच असंघटीत कामगार स्वयंरोजगार करणारे लोकदेखील याच क्षेत्रात मोडतात स्वतंत्रपणे शेती किंवा उद्योग व्यवसाय करणारे आणि रोजंदारीवर पोट भरणारे असे संघटीत कामगारांचे प्रमुख गट आहे
असंघटीत कामगारांपैकी फार मोठा गट शेतीवर मोलमजुरी करून जगतो ४० कोटी असंघटीत मजुरांपैकी ३० कोटी लोक शेतीवरच मोल मजुरी करतात देशातील साडेसहा लाख खेडयांमध्ये जगणाÅया या मजुरांची आAथिक स्थिती आणि जीवनमान त्या त्या भागात मिळणाÅया मजुरीवरच अवलंबुन असते शाश्वत पाणी उपलब्ध असलेला व प्रगत तंत्रज्ञान वापरून शेती करणारा परिसर असेल तर रोजंदारी बरी असते पावसावरच शेती अवलंबून असेल तर रोजगार व रोजंदारीची शाश्वतीच नसते अशा स्थितीतील प्रत्येक कुटुंबाची जगण्याची लढाई विलक्षण असते गरजा अत्यंत कमीत-कमी ठेवून त्या भागवितांना त्यांचा जीव मेटाकुटीला येतो सAवात दरिद्री आणि वाईट स्थितीत जगणारे श्रमिक म्हणजे अविकसित ग्रामीण भागातील असंघटीत मजुर
ग्रामीण भागातून कोणत्याही कारणांनी बाहेर पडणारे अशिक्षित मजूर शहरी भागात आल्यानंतर त्यांना पहिला आधार मिळतो तो बांधकाम क्षेत्राचा रस्ते किंवा इमारतींच्या बांधकामात रोजगार मिळतो व इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत निवारादेखील मिळतो पुरूषांच्या बरोबरीने स्ति्रयाही अशी कामे करत असतात गरोदर स्ति्रयादेखील विटा किंवा सिमेंटचे ओझे वाहतांना दिसतात आपल्या देशातील जवळपास तीन कोटी श्रमिक बांधकामावर मजूरी करीत आहेत
कारखान्यांमध्ये काम करणारे जवळपास १० कोटी कामगार आहेत यानंतर स्वयंरोजगार करणाÅयांचा फार मोठा गट आहे यांना आपल्या जगण्याचा मार्ग स्वतःच शोधावा लागतो काहितरी वस्तूंची किंवा सेवांची विक्री करून हा वर्ग उत्पन्न मिळवत असतो प्रत्येकाची आमदनी वेगवेगळी असते यातील अनेक जण सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असतात काम सतत मिळण्याची खात्री नसल्याने उत्पन्न खूप कमी असते
देहविक्री करणाÅया स्ति्रया या देखील असंघटीत क्षेत्रातच मोडतात करिअर म्हणून कोणी हा व्यवसाय नक्कीच करत नाही काही सामाजिक व बÅयाचदा आAथिक कारणांमुळे हा व्यवसाय नाइलाजाने करावा लागतो तरुणपणी जगणे बरे असते; परंतु उतारवयात जडलेल्या व्याधींमुळे आणि अपुÅया उत्पन्नामुळे जगणे असह्य होते
या असंघटीत कामगारांची प्रत्येकाची दुखणी वेगळी आहेत; परंतु दारिद्र्य आणि उपासमार अनेकांना सहन करावी लागते यिक्षण नसल्याने कमी पगारावर समाधान मानावे लागते त्यांच्या संघटना नसल्याने सामुहिक सौदाशक्ती नसते आठवड्यची सुटी, किरकोळ किंवा आजारी रजा असा प्रकार नसतो काम आज आहे तर उद्या नाही, अशी स्थिती असते या हातावर जगणाÅया लोकांकडून देशांतील अAधे उत्पन्न निAमाण होते; परंतु त्यांच्याकडे कोणीही सहानुभूतीने पहात नाही
No comments:
Post a Comment