Vij Darvadhicha Mula Pravara chya Grahakanna Zhatka by Dr Barhate G H , Dt १ April २००७
'वीज' दरवाढीचा 'मुळा-प्रवरा' च्या ग्राहकांना झटका
डाॅ बारहाते जी एच
०१ एप्रिल २००७
'वीज कायदा २००३ मधील तरतुदीनुसार मुळा-प्रवरा सहकारी संस्थेने (सोसायटी) महाराष्ट्र आयोगाकडे महसुली आवश्यकता व वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केलेला होता संस्थेच्या प्रस्तावातील वीजदर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीप्रमाणेच होते संस्थेच्या प्रस्तावावर दि ८/११/२००६ रोजी टेक्निकल व्हॅलिडेशन झाले यामध्ये विद्युत नियामक आयोगाने संस्थेला पुरवणी माहिती सादर करण्यास साcगbतले होते त्यात संस्थेने महसुली आवशयकता नमूद करुन वीज दरवाढ मान्य करण्याबाबत आयोगास विनंती केली होती दि २/१/२००७ रोजी श्रीरामपूर येथे याबाबत आयोगासमोर जाहीर सुनावणी झाली होती महसुली आवश्यकता व वीज दरवाढीच्या प्रस्तावामध्ये संस्थेने आपल्या विविध प्रकारच्या वीज ग्राहकांसाठी असणारे प्रस्तावित वीजदर वीज वितरण कंपनीच्या दराप्रमाणे (एम एस ई बी ) ठेवले होते
दि २९/९/२००६ रोजी आयोगाने वीज वितरण कंपनीच्या वीज दराबाबत आदेश निर्गमित केले होते व त्याची अंमलबजावणी १/१०/२००६ पासून वीज वितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात सुरु झाली संस्थेच्या कार्यक्षेत्रातील ग्राहकांना त्याप्रमाणे वीजदर लागू होतील, अशी अपेक्षा होती, परंतु २३/३/२००७ च्या आयोगाच्या आदेशानुसार लागू होणारे नवीन वीजदर वाचून ग्राहकांना वीज दरवाढीचा तीव्र झटका बसला वीज वितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रातील व संस्थेच्या कार्यक्षेत्रातील सध्याचे व नवीन लागू होणारे दर याची तुलनात्मक माहिती येथे देत आहे कोणत्याही प्रवAगातील ग्राहकांना वाढीव दराचा शाॅक सहन होणार नाही
१ घरगुती ग्राहक
विजेचा वापर
युनिट
मु प्र संस्थेचे सध्याचे वीजदर
नवीन दरवाढ
प्रतिशत वाढ वीजदरातील
स्थिर आकार प्रति माह रु
वीजदर प्रति युनिट रु
स्थिर आकार प्रति माह रु
वीजदर प्रति युनिट रु
०-३०
२०
१ ००
४०
१ ९०
९०%
३१-१००
३०
२ ५५
१००
४ ००
५६ ८७%
१०१-३००
३०
२ ९५
१००
८ ००
१७१ १९%
३०१ पेक्षा अधिक
३०
४ ५५
१००
१० ००
११९ ७८%
वीज वितरण कंपनी व संस्थेचे वीजदर
विजेचा वापर युनिट
वीज वितरण कंपनीचे दर
संस्थेचे नवीन दरवाढ
प्रतिशत वाढ
स्थिर आकार प्रति माह रु
वीजदर प्रति युनिट रु
स्थिर आकार प्रति माह रु
वीजदर प्रति युनिट रु
स्थिर आकार
वीजदर
०-३०
३ ००
० ४०
४० ००
१ ९०
१२००%
३७५%
दारिद्रयरेषे खालील इतर ग्राहक ०-१००
४०
१ ९०
१०० ००
४ ००
१५०%
१११%
१०१-३००
४०
३ ४०
१०० ००
८ ००
१५०%
१३५%
३०१ पेक्षा अधिक
४०
४ ५०
१०० ००
१० ००
१५०%
१२२%
संस्थेच्या कार्यक्षेत्रातील घरगुती ग्राहकांना वरीलप्रमाणे भरमसाठ वीज दरवाढ सहन करावी लागणार आहे जवळच्या नेवासा तालुक्यातील दारिद्रयरेषेखालील गरीब ग्राहकांचा वीज वापर दरमहा २५ युनिट असे तर त्याला १५ रुपये बिल येईल, परंतु संस्थेच्या गरीब ग्राहकाला मात्र तेवढयाच वीज वापरासाठी ९० रुपयांपेक्षाही अधिक बिल येईल म्हणजे एकाच प्रकारच्या ग्राहकाला ६ पट अधिक बिल द्यावे लागेल, हे मात्र आकलनापलीकडचे आहे तशीच अवस्था इतर घरगुती ग्राहकांची आहे मध्यमवAगीय ग्राहकांचा वापर ५० युनिट गृहीत धरला तर नेवासा तालुक्यातील ग्राहकाला इतर चाAजेस वगळता रु १३५ बिल मात्र संस्थेच्या ग्राहकाला रु ३०० म्हणजे ३ पटीने वीज बिल अधिक द्यावे लागेल
२ व्यापारी ग्राहक
सामान्यपणे घरगुती ग्राहकांपेक्षा व्यापारी ग्राहकांचे दर अधिक असतात प्रथम स्लॅबमध्ये व्यापारी ग्राहकांचे दर घरगुतीप्रमाणेच महागडे आहेत या ग्राहकांच्याबाबतही वीज कंपनीच्या दरांच्या तुलनेत प्रचंड दरवाढ केली आहे २०० युनिटपेक्षा अधिक वीज वापर करणा-या ग्राहकांना प्रतियुनिट रु १० मोजावे लागतील या ग्राहकांचे वीजदर वाढले म्हणजे ते सर्वसामान्य ग्राहकांकडून वसूल होणार व महागाई वाढणार हे निश्चित एकीकडे केंद्र व राज्य सरकार महागाई आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात, परंतु संस्थेच्या ग्राहकांना मात्र महागाईचे चटके तीव्र बसणार आहेत हे पुढील तक्त्यावरुन लक्षात येईल
विजेचा वापर
युनिट
मु प्र संस्थेचे सध्याचे वीजदर
नवीन दरवाढ
प्रतिशत वाढ वीजदरातील
स्थिर आकार प्रति माह रु
वीजदर प्रति युनिट रु
स्थिर आकार प्रति माह रु
वीजदर प्रति युनिट रु
०-१००
७०
२ ५०
१००
४ ००
६०%
१०१-२००
७०
४ १०
१००
८ ००
९५ १२%
२००पेक्षा अधिक
७०(सि फेज)
५ ००
१००
१० ००
१००%
म रा वीज वितरण कंपनीचे व संस्थेचे नवीन दर
विजेचा वापर
युनिट
मु प्र संस्थेचे सध्याचे वीजदर
नवीन दरवाढ
प्रतिशत वाढ
स्थिर आकार प्रति माह रु
वीजदर प्रति युनिट रु
स्थिर आकार प्रति माह रु
वीजदर प्रति युनिट रु
स्थिर आकार
वीजदर
०-१००
१००
२ ९०
१००
४ ००
७२%
१०१-२००
(सि फेज)
३ ७५
१००
८ ००
११३%
२००पेक्षा अधिक
१५०(थ््िरा फेज)
४ ९०
१००
१० ००
१०४%
यावरुन स्पष्ट होते की, व्यापारी ग्राहकांच्या बाबतीत वीज दरवाढ दुप्पट होणार आहे दरवाढ करतांना आयोगाने वीज वितरण कंपनीच्या दराप्रमाणे संस्थेचेही दर ठेवणे आवश्यक होते, परंतु ते न करता संस्थेच्या ग्राहकांना मात्र मोठा भुर्दंड बसणार आहे
३ पाणीपुरवठा योजना-
शहरी व ग्रामीण भागातील लोकांना पिण्यासाठी स्वच्छ व शुध्द पाणीपुरवठा करणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी असते यामध्ये ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचा समावेश होतो सध्याच्या काळात अनेक संस्थांकडे वीज बिलाची थकबाकी आहे त्यातच वीज दरामध्ये ६ पट वाढ झाल्यास या संस्थंची परिस्थिती दयनिय होणार आहे पाणी पुरवठा करामध्ये वाढ करुन या संस्थाही दरवाढ ग्राहकांकडूनच वसूल करतील शेवटी ग्राहकच होपळून निघणार आहेत अAथात वीज दरवाढीला ग्राहकांचाही विरोध नाही, परंतु त्यांना आAथिकदृष्ट्या परवडेल असा वीजदर असावा, किमान वीज कंपनीच्या दराप्रमाणे वीजदर असावेत, ही ग्राहकांची किमान अपेक्षा पूर्ण झालेली नाही, हे पुढील तक्त्यावरुन लक्षात येईल
विजेचा वापर
युनिट
मु प्र संस्थेचे सध्याचे वीजदर
नवीन दरवाढ
प्रतिशत वाढ वीजदरातील
स्थिर आकार प्रति माह रु
वीजदर प्रति युनिट रु
स्थिर आकार प्रति माह रु
वीजदर प्रति युनिट रु
शहरी विभाग
६०रु प्रति एच पी
२ २५
३००रु प्रति एचपी
८ ००
२५५ ५६
ग्रामीण विभाग
क वर्ग
३०रु प्रति एचपी
१ ४०
३००रु प्रति एचपी
८ ००
४७१ ४२
नगरपालिका
ग्रामपंचायत
२० रु प्रति एचपी
० ७५
२५०रु प्रति एचपी
६ ००
७०० ००
म रा वहज वितरण कंपनीचे दर
विजेचा वापर युनिटमध्ये
मु प्र संस्थेचे सध्याचे वीजदर
०-२० केडब्ल्यु
५० रु प्रति केव्हीए
१ ००
२१-४० केडब्ल्यु
६०रु प्रति केव्हीए
१ ५०
४१-५०केडब्ल्यु
९०रु प्रति केव्हीए
२ ४०
वरील तक्त्याची तुलना केल्यानंतर स्पष्ट होते की, संस्थेच्या सध्याच्या दरापेक्षा जवळपास ५ पट वाढ झालील आहे यापैकी केवळ स्थिर आकार रु ६० प्रतिएचपी प्रति महिना असताना त्यामध्ये ५ पट वाढ होऊन तो ३०० रुपये झालेला आहे तसेच वीज दरातही प्रचंड वाढ केली आहे विशेषतः ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीची आAथिक स्थिती मुळातच हलाखीची असते सध्याच्या प्रचलित दराप्रमाणेही त्यांच्याकडून वेळेवर वीज बिल भरणा होत नाही, अशी परिस्थिती असताना त्यांच्या स्थिर आकारात तब्बल ११ पट वाढ केली आहे व वीज दरामध्ये ७ पटीने वाढ केली आहे पाणीपुरवठ्याचे वीजदर वीज कंपनीच्या कार्यक्षेत्रातील ग्राहकांपेक्षा अधिक आहेत हे आयोगाने मान्य केले असले तरी या संस्थेच्या कार्यक्षेत्रातील कोणतीही ग्रामपंचायत याप्रमाणे वीजदेयक देऊ शकणार नाही शहरी भागाच्या बाबतीतही स्थिर आकारात ५ पट वीजदरात ३ पट वाढ केली आहे उदा ४० एचपीच्या मोटारीसाठी रु १२०००/- केवळ स्थिर आकार द्यावा लागेल शहरी भागाची परिस्थिती ही ग्रामीण भागापेक्षा वेगळी नाही शेवटी वाढलेले वीजदर पाणीपट्टीच्या वाढीतून वसूल केले जातील म्हणजे भरडला जाणार तो ग्राहकच!
४ कृषी ग्राहक -
कृषी क्षेत्रासाठी सवलतीच्या दराने वीज पुरवठा करण्याचे धोरण सरकारचे आहे त्यादृष्टीने शेतक-यांकडून प‹लॅट रेट पध्दतीनुसार अश्वशक्तीवर आधारित वीजदर आकारले जातात मुळातच कृषी मालाला उत्पादन खAचावर आधारित बाजारभाव मिळत नसल्याने शेतीचा धंदा आतबट्टयाचा होत चालला आहे
मुळा-प्रवरा वीज सहकारी संस्थेच्या ग्राहकांना रु ११० प्रति एच पी प्रतिमहिना या दराने वीजदर लागू होते संस्थेतील एकूण वीज जोड भारापैकी ७० टक्के वीजभार कृषी क्षेत्राचा आहे कृषी क्षेत्राला सवलतीच्या दराने वीज पुरवठा असल्याने वीज खरेदी व विक्री यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत येत होती वास्तविक वीज कंपनीच्या वीज खरेदी दरामध्ये कपात करुन ही तफावत कमी करणे सहज शक्य होते या संस्थेचे ग्रामीण भागातील कामकाज विचारात घेऊन Bulk supply Tariff ठरविणे आवश्यक होते व त्यानुसार संस्थेला परवडेल असा दर निश्चित होणे आवश्यक होते, परंतु आयोगाने ठरवून दिलेला दर रु २ ८० अधिक मागणी आकार याप्रमाणे हा दर प्रतियुनिट रु ३ ५० इतका झाला व तफावत वाढत गेली BST चा दर कमी करुन तफावत कमी करण्याऐवजी संस्थेच्या ग्राहकांना जबरदस्त दराने वीज विक्री करण्याचे आदेश आयोगाने दिले त्यामुळेच इतर ग्राहकांबरोबरच शेतकरी ग्राहकांचेही दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत कृषी क्षेत्राचे वेगळे स्थान म्हणून कोणत्याही प्रकारची सवलत दिलेली नाही शेतक-यांची किमान अपेक्षा होती की, म रा वीज वितरण कंपनीच्या दराप्रमाणे आकारणी होईल, परंतु तसे न होता सध्याच्या रु ११० वरुन ५०० इतकी दरवाढ केली आहे जवळपास पाचपट दरवाढ शेतक-यांच्या आवाक्याबाहेरची आहे अगदी भांडवलदार, श्रीमंत शेतकरीसुध्दा या दरानुसार वीज देयक अदा करु शकणार नाही पुढील तक्त्यात सध्याचे व नवीन दर दिलेले आहेत
विजेचा वापर
प‹लॅट रेट
मु प्र संस्थेचे सध्याचे वीजदर
नवीन दरवाढ
प्रतिशत वाढ वीजदरातील
स्थिर आकार प्रति माह रु
वीजदर प्रति युनिट रु
स्थिर आकार प्रति माह रु
वीजदर प्रति युनिट रु
०-५ एचपी
११०
--
५००
--
३५४ ५४
५ ते १० एचपी
११०
--
५५०
--
४००
१० एचपीपेक्षा जास्त
११०
--
५५०
--
४००
मीटर पध्दती
११०
० ९०
४०
४ ००
३४४
म रा वीज कंपनीच्या कार्यक्षेत्रातील ग्राहकांचे दर संस्थ्ेाव्यतिरिक्त वीज वितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात कृषी क्षेत्रासाठी रु १८० प्रतिएचपी प्रतिमहिना याप्रमाणे आहेत या दराच्या तुलनेत २ ५ पट दरवाढ आहे तसेच मिटर पध्दतीनुसार प्रतियुनिटचा दर रु १ १० इतका आहे संस्थेतील शेतक-यांना मात्र त्याच्या ४ पटीने आकारणी होते एकाच राज्यातील विविध ठिकाणच्या ग्राहकांकडून याप्रमाणे मोठ्या प्रमाणात तफावत ठेवून दर आकारणी केली जाते यातील तत्व लक्षात येत नाही
वास्तविक शेतक-यांच्या कृषी मालाला उत्पादन खAचावर आधारित दर मिळणे आवश्यक आहे प्रत्यक्षात असे होत नाही सर्वसामान्य गरीब समाजाला गहू स्वस्त किंमतीत मिळणे गरजेचे असले तरी शेतक-यांने स्वतः तोटा सहन करुन असा स्वस्त गहू उपलब्ध करुन देणे योग्य होणार नाही शेतक-यांकडून जर वरीलप्रमाणे वीज आकारणी होणार आहे, मग त्याच्या गव्हाला रु ३००० प्रति क्विंटल, उसाला ३००० प्रतिटन, कांद्याला २००० प्रति क्विंटल याप्रमाणे दर मिळणे आवश्यक आहे कारण ५ एचपीसाठी रु २५०० प्रतिमहिना व एका वAषासाठी रु ३०००० इतके बिल येणार आहे ५ एकर शेती असणा-या सामान्य शेतक-याला एका वAषात वीज खAचाव्यतिरिक्त इतर Aख्चा वगळता ३०००० रुपयाचे निव्वळ उत्पन्न मिळत नाही तर त्याच्याकडून ३०००० बिल भरणे कसे शक्य होईल १९९६ ते २००६ या दहा वAषाच्या काळात शेतमालाच्या किंमतीमध्ये विशेष बदल झाला नसताना पाचपटीने वीजदर वाढणे कोणत्या तत्वाला बसते?
दुसरे महत्वाचे म्हणजे विविध कृषी मालाच्या आधारभूत किंमती राष्ट्रीय कृषीमूल्य आयोग निAधारित करते या किंमती संपूर्ण देशासाठी सारख्याच असतात उदा गव्हाचे दर संगमनेर तालुक्यात ८०० रु व श्रीरामपूर तालुक्यात रु २००० आहेत, असे नाही मग संगमनेरचा शेतकरी ५ एचपीसाठी रु ९०० बिल देतो, पण संस्थेच्या ग्राहकांकडून रु २५०० म्हणजे पाचपट वसुली संस्थेच्या शेतक-यांच्या शेतमालाला पाचपटीने अधिक किंमत मिळते काय? वास्तविक विविध ठिकाणच्या शेतमालाच्या किंमती कमी-अधिक प्रमाणात सारख्याच असल्याने वीज दरामध्येही समानता असणे आवश्यक आहे संस्थेच्या बाबतीत मात्र असे घडलेले नाही शेतक-यांना देशोधडीला लावण्याचा हा प्रयत्न आहे
वीज कायदा २००३ मधील तरतुदीनुसार अधिकाधिक शेतक-यांनी मिटर बसवावे, असा आग्रह विद्युत नियामक आयोगाचा आहे, परंतु जर मिटर पध्दतीने ४ रु प्रतियुनिट प्रमाणे आकारणी असेल तर कोणता शेतकरी मिटर पध्दतीस तयार होईल उदा शेतक-यांकडे ५ एचपीची मोटार आहे व दररोज सरासरी फक्त ८ तास विद्युत पंप चालविला जातो तर दररोज ३० युनिट एका महिन्यातून २५ दिवस मोटार चालते, म्हणजे ७५० युनिट ७५०x४=३०००रु + २०० स्थिर आकार याप्रमाणे ३२०० रुपये बिल भरणे शक्य होणार आहे काय? अश्वशक्तीनुसार असेल २०००+२००=२२०० बिल येईल, परंतु राज्याच्या इतर ग्राहक मात्र ९००+७५= ९७५ रु बिल भरतील ही तफावत २ ५ पटीपेक्षाही अधिक आहे यातील महत्वाची गोष्ट म्हणजे, या दरामध्ये भविष्यकाळात अजून वाढ होणार आहे सध्या बीएसटी रु २ ८० आहे वीज कंपनीने पुढील तीन वAषासाठी सादर केलेल्या वीजदर प्रस्तावामध्ये संस्थेसाठी रु ४ पेक्षाही अधिक दर प्रतियुनिटसाठी प्रस्तावित केला आहे साधारण महिन्यात याबाबत जाहीर सुनावणी होईल त्यावेळेस बीएसटीमध्ये वाढ झाली तर सध्याच्या सर्व दरामध्ये याचप्रमाणे वाढ होणार आहे अशी भीती वाटते की, संस्थेच्या ग्राहकांना भविष्यकाळात प्रतिएचपी प्रतिमहिना ७०० ते ८०० रु इतका दर होणार आहे, परंतु त्याचवेळेस राज्यातील इतर शेतकरी मात्र रु १९५ प्रमाणे बिल भरणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बंधूंनी या दरवाढीचा एकत्रितपणे निषेध करावा व आपले दरही वीज वितरण कंपनीच्या दराप्रमाणेच असावेत, असा आग्रह संस्थेकडे व शासनाकडे धरावा
५ सार्वजनिक रस्त्यावरचे दिवे-शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यावर दिवे असणे अत्यावश्यक आहे यांचे दरही मोठया प्रमाणात वाढविले असून ग्रामीण व शहरी भागातील दर समान ठेवले आहेत यामध्ये साधारणपणे दुप्पट वाढ झाली आहे ग्रामपंचायत, नगरपालिका यांना हे वीज बिल द्यावे लागते, परंतु समाजाच्या पैशातून बिल भरत असल्याने याबाबत पुढारी मंडळी ही बाब गाcभbAयाने घेत नाही
विजेचा वापर
युनिट
मु प्र संस्थेचे सध्याचे वीजदर
नवीन दरवाढ
स्थिर आकार प्रति माह रु
वीजदर प्रति युनिट रु
स्थिर आकार
प्रति एचपी प्रति माह रु
वीजदर
ग्रामपंचायत अ,ब,क
२०
१ ७०
१००
४ ००
नगरपालिका
२०
२ ५०
१०
४ ००
६ लघुउद्योग-
ग्रामीण भागाच्या विकासामध्ये लघुउद्योगांचा सहभाग महत्वाचा आहे, परंतु त्यांच्याही दरामध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली आहे, पिठ गिरण्यांचा समावेश या ग्राहकांमध्ये होतो त्याचे वीजदर दुपटीने वाढल्यानंतर साहजिकच दळणाच्या किंमती वाढतील शेवटी बोजा ग्राहकावरच पडतो
विजेचा वापर
युनिट
मु प्र संस्थेचे सध्याचे वीजदर
नवीन दरवाढ
स्थिर आकार प्रति माह रु
वीजदर प्रति युनिट रु
स्थिर आकार
प्रति एचपी
माह रु
वीजदर
०-१०००
६०
२ ४०
३५०
५ ००
१००१-१५००
६०
३ ००
३५०
७ ५०
१५०० पेक्षा अधिक
६०
३ ४०
३५०
७ ५०
स्थिर आकारात पाचपटीपेक्षा अधिक तर वीज दरामध्ये दुपटीपेक्षा अधिक वीजदर वाढ झाली आहे याउलट म रा वीज कंपनीच्या कार्यक्षेत्रात मात्र १००० युनिट पर्यंतच्या वीज वापरासाठी रु ३ प्रतियुनिट व त्यापेक्षा अधिक वीज वापरासाठी रु ४ प्रतियुनिट दर आहे थोडक्यात राज्यातील इतर ग्राहकांच्या तुलनेतही लघुउद्योगांचे वीजदर दुप्पट आहेत संस्थेची महसुली तफावत भरुन काढण्यासाठी वीजदर वाढ केली, असे आयोगाचे मत असले तरी Bulk supply Tariff चे दर कमी करुन ही तफावत भरुन काढता येईल संस्थेने सुध्दा योग्य त्या यंत्रणेकडे दाद मागून संस्थेच्या ग्राहकांचे हितरक्षण करावे हीच विनंती
No comments:
Post a Comment