Thursday, January 9, 2025

Bachat Guntavanukiche Mahattva by Dr Adik B R , Dt १२th October २०१०

बचत गुंतवणुकीचे महत्व

डाॅ  आदिक बी  आर 

१२ आॅक्टोबर २०१०

सण उत्सवांची मालिका सुरू झालेली आहे  दीपावली जवळ आली आहे  खरीपाची पिके तयार होत आहेत  शेतकÅयांना दोन पैसे मिळतील  पगारदारांना आॅक्टोबरचा पगार नोव्हेंबरला न मिळता कदाचित आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवडयातच दिला जाईल  काहींना बोनस मिळेल  भागधारकांना लाभांशाची रक्कम दिवाळीपूAवी प्राप्त होईल  देण्या-घेण्याची अनेक व्यवहार दिवाळीपूAवी पुर्ण होत असल्याने आAथिक व्यवहारांची चक्रे वेगाने फिरू लागतील  एकंदरीतच अर्थव्यवस्थेला नोव्हेंबरमध्ये उधाण आलेले असेल  आपल्या देशातील एकूण विक्रीपैकी जवळपास  ६० टक्के विक्री आॅक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यात होत असते  लहान मोठ्या वस्तूंपासून सोने व स्थावर खरेदी याच काळात मोठया प्रमाणावर होत असते  हा सर्व खर्च करत असतांना बचत व गुंतवणूक महत्वाची असते  हे अधोरेखीत करण्यासाठी हा लेख        

दीपावली हा आपला प्रमुख राष्ट्रीय सण आहे  अनेक दृष्टीने महत्वाचा असलेला हा सण सAवांचाच आवडता असतो  पत्नी पतीला व बहीण भावाला ओवाळते  ओवाळणी म्हणून पती किंवा भाऊ ऐपतीप्रमाणे आपल्या पत्नीला व बहिणीला काहीतरी देत असतात  लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची म्हणजेच धनाची पुजा केली जाते  सोने, पैसा, याचबरोबर विविध प्रकारची धान्ये, कडधान्य व फळा-फुलांची पुजा केली जाते  लक्ष्मी किंवा संपत्ती म्हणजे केवळ पैसा किंवा सोने नाही,तर मानवी गरजा पूर्ण करणाÅया सर्व गोष्टी या संपत्तीच आहे  सर्व गोष्टींचा वापर अत्यंत काटेकोरपणे केला जावा म्हणूनच दीपावलीला लक्ष्मीपुजन केले जाते या अAथाने दीपावलीला गुंतवणुकीचेच महत्व साcगbतले जाते 

गुंतवणूक करणे हा गुंतागुंतीचाच प्रकार आहे  प्रत्येक कुटुंब आपल्यापरीने गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत असते  परंतु प्रत्येकाची गुंतवणूकीची कल्पना मात्र भिन्न असते  अत्यंत गरीब लोक मोठया कुटुंबावर गुंतवणूक करतात  व वृध्दापकाळी आपला मुलगा आपली काळजी एकतरी मुलगा घेईल अशी आशा करतात  मध्यमवAगीय मुला मुलींच्या शिक्षणावरील गुंतवणूकीला महत्व देतात  शेतकरी वर्ग जमीन व पिकांवर गुंतवणूक करतात  उद्योजक उद्योग विस्तारावर गुंतवणूक करतात  व्यापारी व्यापारात गुंतवणूक वाढवून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करत असतात  अशाप्रकारे प्रत्येकजण वेगवेगळया हेतूने गुंतवणूक करत असल्याने गुंतवणूकीचा विषय गुंतागुंतीचा बनतो 

गुंतवणूक करण्यासाठी पहिल्यांदा बचत करणे आवश्यक आहे  व्यक्तीगत स्तरावर एखाद्या व्यक्तीने बचत केली नाही तर तो स्थावर किंवा जंगम मालमत्ता विकून किंवा कर्ज घेऊन जगु शकेल  परंतु संपूर्ण समाज कर्ज घेऊन जगू शकत नाही  समाजात काही लोक व संस्था बचत करत असतात  म्हणूनच इतरांना कर्ज मिळू शकतात  कोणीही बचत न करता सAवांनीच कAजे घेण्याचे ठरविले तर ते शक्यच होणार नाही  आपल्याकडे बचत व गुंतवणूकीची बÅयापैकी परंपरा आहे  घरातील वृध्द व विशेषतः स्ति्रया बचतीबाबत विशेष जागरूक असतात  कठीण परीस्थिती निAमाण झाल्यास बचत हातभार लावते  ही शिकवण ते कुटूंबातील तरूणांना देत असतात  आपल्या या परंपरेमुळे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आपण जवळपास  ३२ टक्के बचत करत असतो  अमेरिकेचे बचतीचे प्रमाण २ टक्के देखील नाही 

                             अमेरिका भारतापेक्षा अत्यंत समृध्द् राष्ट्र आहे  त्यांचे राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न आपल्यापेक्षा अनेक पटींनी जास्त आहे  परंतु बचतीचे महत्व त्यांनी आपल्यासारखे जाणलेले नाही  अमेरीकेतील लोक मिळकतीपेक्षा जास्त कर्ज घेऊन अमाप खर्च करत असतात  बचत करुन गुंतवणूक करण्याबाबतची जाणीव त्यांच्यात कमीच आहे  २००८ सालच्या महामंदीचे हेदेखील एक महत्वाचे कारण होते  सबंध अमेरिका राष्ट्रच कAजावर जगू पहात होते  बँकांकडून घेतलेली कAजे फेडता येत नाही म्हणून अनेक बँका बुडाल्या  बुडणाÅया या बँका वाचविण्यासाठी सरकारने मुक्तहस्ताने त्यांना पॅकेज दिलीत  यामुळे सरकारचेच कर्ज अवाढव्यपणे वाढतच गेले आहे  अमेरिकेला या आAथिक आरिष्टातून बाहेर पडणे अत्यंत कठीण झाले आहे 


लक्ष्मीचा योग्य आदर केला नाही तर काय होते, हे अमेरिकेच्या उदाहरणावरून सहज लक्षात येते  तेव्हा येत्या चार महिन्यात खर्च करतांना बचत व गुंतवणूकीचे महत्व आपण विसरू नये, आजूबाजूला लोक मिठाई, कपडे, मनोरंजनाची साधने, फटाके अशा विविध वस्तूंवर खर्च करत असल्याने आपणही असा खर्च करावा हे वाटणे स्वाभाविकच आहे  शेजाÅयाने एलसीडी टी व्ही  घेतला की, आपला रंगीत टीव्ही देखील कृष्णधवल वाटू लागतो  चारचाकींचे अनेक नविन माॅडेल्स बाजारात उपलब्ध आहेत  नॅनोला बुकींग करण्याची गरज नाही  मंडईत भाजी खरेदी करण्यासारखी नॅनो खरेदीची बाब झाली आहे  अनेक माॅडेल्सचे मोबाईल व दुचाकी वाहने उपलब्ध आहेत  यासाठी घरातील सर्वजण व विशेषतः मुले हटट् करत असतात  या सर्व गोष्टी घेण्यासाठीच दीपावली असते असे जाहिरातींमुळे वातावरण झालेले असते  अशा स्थितीत आपल्या मनाला व इतरांना आवर घालून अनावश्यक खर्च कमी करण्याची कसरत करावी लागते  ही कसरत उत्तमपणे करणे म्हणजेच खÅया अAथाने लक्ष्मीपूजन करणे होय 

No comments:

Post a Comment

1 असा आहे अहमदनगर जिल्हा!

 असा आहे अहमदनगर जिल्हा! डाॅ  बारहाते जी  एच दि  २६ जानेवारी २०११ भारतीय द्विपकल्पाच्या उत्तर पश्चिम भागात वसलेला महाराष्ट्र हा प्रामुख्याने...