Dugdhabhesal Kuyog ! by Dr Adik B R , Dt १८th September २०१०
दुग्धभेसळ कुयोग !
डाॅ आदिक बी आर
१८ सप्टेंबर २०१०
"दुग्धशर्करायोग" म्हणजे दुधात साखर मिळण्याचा आनंदी प्रसंग, सAवात उत्कृष्ट योग! मग त्याच्या विरुध्द् दुधात विष मिळणे म्हणजे सAवात वाईट कुयोग आपोआपच ठरतो! ! दुधाला आपण पूर्ण अन्न मानतो शरीर स्वास्थासाठी आवश्यक असणारे सर्व घटक दुधात योग्य प्रमाणात असतात म्हणूनच आबालवृध्दांना व रुग्णांना दूध आग्रहाने दिले जाते आपल्या काळजाचा तुकडा असणाÅया लहानग्याला प्रेमाने दूध पाजणाÅया आईला आपण अमृत नाही तर विष पाजत आहोत, हे कळले तर काय होईल ? ते अभागी बालक आजारी पडले किंवा दगावले तर त्या कुटुंबाची अवस्था काय होईल? सर्व समाजाला विष पाजणारे पापी 'उद्योजक' याचा विचार करणार आहेत का? व्यक्तीगत हितासाठी कोणत्या स्तरापर्यंत नीतिमत्ता ढासाळू द्यायची, याचा विचार करायला हवाय नाही तर आपल्या समाजाच्या अस्तित्वाबद्लच प्रश्न निAमाण होईल
पूAवी राजेशाहीत राजाला अन्न किंवा पेय देण्यापूAवी त्याची परीक्षा घेत असत ते अन्न किंवा पेय देण्यापूAवी दूसÅया व्यक्तीला दिले जाई विषबाधा होणार नाही याची खात्री झाल्यानंतर ते राजाला दिले जाई आजच्या व्यावसायिक जगात ग्राहकाला 'राजा' मानण्याचा प्रघात आहे, परंतु ग्राहक राजाला पूAवीच्या राजासारखा उद्योग करणे शक्य नाही विविध उत्पादक, उद्योग व व्यावसायिकांकडून पुरविल्या जाणाÅया वस्तु व सेवांचा प्रयोग ग्राहकांना स्वतःवरच करुन घ्यावा लागतो स्वतःसाठी लागणाÅया सर्व गोष्टी स्वतः तयार करणाÅया अप्रगत व्यवस्थेत भेसळ करण्याचा प्रश्नच नव्हता आता प्रगत व्यवस्थेत कोणतीही व्यक्ती किंवा समाज स्वयcनbर्भर राहूच शकत नाही प्रत्येक जण दूसÅयावर अवलंबून आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या हितासाठी, सुखासाठी आणि अस्तित्वासाठी दुसÅयावर अवलंबुन आहे अशा स्थितीत नीतिमत्ता ही कोणी एकाने पाळण्याचा प्रश्न नाही हे सAवांचेच परम कर्तव्य ठरते
'व्यावसायिक नितीमत्ता' म्हटल्यावर प्रकरण फारच अवघड वाटते प्रत्यक्षात मात्र तसे नाही कारण मनुष्य स्वभावतःच विचार करायला शिकतो तसेच त्याला चांगले-वाईट, योग्य -अयोग्य स्वभावतःच समजते ही नैसAगिक देणगी आहे योग्य प्रमाणात नफा मिळविणे हे कोणत्याही व्यक्तिगत व्यावसायिकाचे किंवा उद्योगाचे ध्येय असतेच ते वाईट आहे, असे नाही किंबहूना ते यशाचे गमकच मानले जाते, परंतु आपल्या व्यक्तीगत नफयासाठी अयोग्य ध्येय, अयोग्य साधने किंवा अयोग्य कृती करून दुसÅयाचे अहित करणे नीतिमूल्यांना धरून नाही
कोण्त्याही वस्तू किंवा सेवेचे उत्पादन, वितरण किंवा विक्री करतांना संबcधbत उत्पादक किंवा व्यावसायिकासमोर अनेक प्रश्न निAमाण होतात कोणते उत्पादन करावे कसे करावे कोणासाठी करावे किती प्रमाणात करावे गुणवत्ता कशी राखावी त्यातून समातहित साध्य होते का पAयावरण संतुलन राखले जाते का असे अनेक प्रश्न समोर येतात या प्रश्नांचा विवेकपूर्ण विचार करून त्यानुसार निर्णय व कृती अपेक्षित आहे उत्पादकाने केवळ व्यक्तिगत हिताचा विचार करून व्यापक समाजहिताला तिलांजली दिली तर त्याचा उद्योग अल्पजीवी ठरेल त्यातून समाजाचे व अcतbमतः त्या उद्योजकांचेही अहित होईल प्रत्येक उत्पादक किंवा व्यावसायिक हा देखील उपभोक्ता किंवा ग्राहक असतोच सर्वच अनितीने वागले तर त्याचा फटका सAवांनाच बसेल दुधात भेसळ करून इतरांना विष पाजणारा कधीतरी आजारी पडणारच मग त्याला गुणकारी औषध म्हणून भेसळयुक्त विष पाजले जाईल
समाज जीवनाच्या सुरूवातीपासूनच कौरव पांडव वृत्ती अस्तित्वात होती व ती राहणार आहेच परंतू अनितीने वागणारे संख्येने कमी होते म्हणूनच समाजाचे अस्तित्व अजून टिकून आहे परंतू आत कौरवांची संख्या शंभरांपेक्षा अधिक व पांडवांची संख्या पाचपेक्षा कमी झाल्याचे जाणवते आहे जगातील सर्व धर्मग्रंथ नितीमत्तेने वागणे शिकवितात साॅक्रेटिस स्पेटोपासून ते स्वामी विवेकानंद ते महात्मा गांधीपर्यंत सर्व विचारवंतांनी नीतीमूल्यांची महती साcगbतली आहे मनुष्यातील खलवृत्ती जाऊन त्याच्या ठायी सत्कAमाची वृत्ती जागी होण्याबाबत माऊली ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितले आहे परंतु मनुष्याची प्रवृत्ती व कृती कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे वाकडीच आहे
नीतिमूल्ये पाळण्याबाबत गांधीजींनी आपल्या वर्तणुकीतून साÅया जगाला धडा दिला आहे अगदी लहान वयात शिक्षकानेच काॅपी करण्याबदद्ल साcगbतले असता त्यांनी काॅपी केली नाही गांधीजींचा नीतिमूल्ये पाळण्याबाबतचा नंतरचा इतिहास सर्वज्ञात आहेच गांधीजींच्या मृत्युनंतर विख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईने म्हटले होते की, अनेक वAषानंतर गांधीजी ही रक्तामासाची व्यक्ती होऊन गेली, याबाबत जगाचा विश्वास बसणार नाही याचाच अर्थ जग उत्तरोत्तर अधिक अनितीमान होईल असेच त्यांना वाटत होते गांधीजींनी पुढील सात बाबींचा सामाजिक पाप म्हणून उल्लेख केलेला आहे १) तत्वहीन राजकारण २) श्रमाविना संपत्ती ३) नीतिमत्तेविना व्यवसाय ४)चारित्र्याविना शिक्षण ५) अनैतिकतेतून आनंद ६) माणूसकीविना शास्त्र आणि त्यागाविना भक्ती
आजचा आपला समाज या सर्व पापांमध्ये आकंठ डुबत आहे भेसळयुक्त दूध घुसळले तर तत्वहीन राजकारण्यांपासून कष्टाविना संपत्ती कमवि्ाणारे अनेक नीतिहीन व्यावसायिक सापडतील नितीमूल्ये पाळली जात नाहीत म्हणूनच कायदे व शिक्षा यांची निAमीती झालेली आहे समाजजीवनात विष कालविणाÅया सर्व पापी लोकांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही समाजाची रास्त अपेक्षा आहे
No comments:
Post a Comment