Thursday, January 9, 2025

 Gavanmadhil Badalte Aarthkaran by Dr Adik B R , Dt १३th August २०१०

गावांमधील बदलते अर्थकारण

डाॅ  आदिक बी  आर 

१३आॅगस्ट २०१०

भारत हा परंपरागत खेडयांचा देश  स्वातंत्र प्राप्तीपर्यंत खेडयांमधील अर्थव्यवस्था फारशी बदललेली नव्हती  शेतजमीन हेच उत्पादनाचे व पAयायाने उत्पन्नाचे एकमेव साधन होते  संपूर्ण ग्रामीण जीवन जमिनीभोवती फिरत असे  सAवांचा प्रवास हा मातेपासून मातीपर्यंत असायचा  मातीलाही मातेचेच स्थान होते  जमीन असणारे अर्थकारणांच्या केंद्रस्थानी होते  गावात शेती कसणारे शेतकरी, त्यांना मदत करणारे बलुतेदार व इतर कामे करणारे अलुतेदार असे तीनच वर्ग होते  जगण्याला आवश्यक अशी धान्य, कडधान्य व तेलबियांची पिके घेतली जात  दुधासाठी गावराण गायी किंवा शेळया पाळल्या जात असत  काहीजण कोंबड्या पाळत असत 

भारतातील ग्रामीण जीवन लाखो वAषे निसAगाच्या तालावर संथगतीने चाललेले होते  मौसमी पावसाच्या मदतीने पारंपारिक पिके घेतली जात असत  कुटुंबातील मुले व वृध्द् सोडून इतर सर्वजण शेतीच्या कामांमध्ये गुंतलेली असत  धान्य उत्पादन झाल्यानंतर सर्व बलुतेदारांना ठरलेला हिस्सा दिला जाई  धान्य व चाÅयाच्या बदल्यात बलुतेदार शेतकÅयांच्या सर्व गरजा वर्षभर भागवत राही  गावातील सर्व गरजा गावातच पूर्ण होत असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था आत्मनिर्भर होती  पैशाचा वापर अत्यंत मAयादित होता  बहुतेक व्यवहार वस्तूंच्या मोबदल्यात वस्तू असाच असायचा 

आत्मनिर्भर अशा या ग्रामीण अर्थव्यवस्थेत यंत्रनिAमीत वस्तूंचा प्रवेश आणि प्रसार वाढत गेला  आणि गावांमधील अर्थकारण झपाटयाने बदलु लागले  स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या प्रत्येक दशकामध्ये बदलांची गती आणखी तीव्र होत आहे  गावांची आत्मनिर्भरता पूर्णतः संपलंली आहे  आज गावांचे संबंध स्थानिक बाजारपेठांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत विस्तारलेले आहेत  गावांच्या पीक रचनेमध्ये आमुलाग्र बदल झालेले आहेत  पारंपारिक पिकांऐवजी आज नगदी पिकांकडे कल वाढलेला आहे  भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती, फुले यांचे उत्पादन वाढत चालले आहे  निAवाह शेती किंवा केवळ जगण्यासाठी शेती करणे ही कल्पना कालबाह्य झाली आहे  आज शेतीकडे एक व्यवसाय म्हणून शेतकरी पाहू लागला आहे 

आजची ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णतः पैसाधिष्ठीत झालेली आहे  सर्व व्यवहार पैशाच्या माध्यमातूनच होत आहेत  शेतीसाठी लागणारी सर्व साधने व आदाने पैसे देऊन विकत घ्यावी लागतात  यासाठी शेतमाल विकून पैसे कमवावे लागतात  शेतमजूाही पैशातच मोबदला घेतात  गावांचा इतर जगाशी संबंध वाढल्याने गावे वेगाने बदलत आहेत  शहरात मिळणाÅया अनेक वस्तू व सेवा गावातही मिळू लागल्या  गावात टि  व्ही  पोहोचला आणि भोगवादाला चालना मिळाली  जाहीरातीत पाहिलेल्या अनेक गोष्टी खरेदी करण्याकडे कल वाढत चालला आहे  जास्त उत्पन्न मिळविण्याची धडपडही वाढत आहे  वडीलोपाAजित जमिनीचे प्रत्येक पिढीत भाऊ हिस्से होत गेल्याने कुटुंबाकडील जमीन कमी होत चालली आहे  जमीन कमी होत असल्याने उपजिवीकेसाठी पAयायी व्यवस्था करणे गरजेचे होवू लागले आहे  यामुळेच शहरांकडे धाव घेणाÅयांची संख्या वाढत आहे 

शहरांमध्ये मिळणारे अधिक उत्पन्न व चांगले जीवनमान ग्रामीण लोकांना आकAषित करत असतो  या आकर्षणामुळे लोक शहरांकडे धावतात  किंवा काहींना रोजगाराचे साधन नसल्याने ते शहरात दाखल होतात  चांगले शिक्षण किंवा संपत्ती असणारे नोकरी किंवा व्यवसायात स्थिरावतात  व इतर जण काही तरी काम धंदा करुन मजुरी कमवितात  शहरात स्थलांतरीत झालेल्यांचे गावांशी असलेले संबंध क्षीण होत जातात 

 गावात राहीलेल्या संपूर्ण कAत्या लोकसंख्येचा केवळ शेतजमीन आधार देवू शकत नाही  म्हणूनच शेतीबरोबरच इतर व्यवसाय करण्याकडे कल वाढत चाललेला आहे  शेतीला पुरक व्यवसाय म्हणून दुग्धोत्पादन, शेळी मेंढ्या पालन, मत्स्यशेती, फुलोत्पादन, मधमाशा पालन असे अनेक व्यवसाय वाढू लागले आहेत  शेतीसाठी लागणारी औजारे तयार करणारे उद्योग सुरू होत आहेत  शेतीमधील ट्रॅक्टर इलेक्ट्रीक मोटार, फवारणी पंप व इतर साधने दुरूस्त करण्यासाठी कारागिरांची गरज व संख्या वाढत आहे  गावातच कपडे शिवणारे कारागीर वाढतच आहेत  अनेक गावांमध्ये नाभिकांच्या दुकानांबरोबरच ब्युटीपार्लर दिसू लागली आहेत  पिठाच्या गिरण्या, किराणा दुकाने, कृषी सेवा केंद्रेही अनेकांना रोजगार पुरवितात  गावांमध्ये सायकलींबरोबरच मोटारसायकली, ट्रक्टर व काही प्रमाणात मोटारगाडयांची संख्या झपाटयाने वाढत आहे  या साधनांची दुरूस्ती करणारी दुकाने अनेक गावांमध्ये आहेत 

स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या साठ वAषात केवळ शेतीवर पूर्णतः आत्मनिर्भर असलेली ग्रामीण व्यवस्था खूपच बदलली आहे  आज गावांमध्ये शेतीमधून जेवढे उत्पन्न मिळते त्यापेक्षा थोडे - अधिक उत्पन्न वर उल्लेख केलेल्या व्यवसायांमधून मिळते  यामुळे ग्रामीण अर्थकारण बरेच बदललेले आहे  ग्रामीण उत्पन्नामध्ये स्थिरता आली आहे  पाऊस कमी-अधिक पडला तरी शेतीला पुरक उत्पन्न मार्ग उपलब्ध झाले आहेत  उत्पन्न मिळविण्याबाबत लोक अधिक स्वतंत्र झाले आहेत 


पूAवी शेतकरी, बलुतेदार व अलुतेदार एकमेकांवर पुर्णतः अवलंबून होते  त्यांचे संबंध आAथिक हितसंबंधामुळे घटट् झालेले होते  आज उत्पन्नाचे अनेक पAयाय निAमाण झाल्याने उत्पन्न आणि आAथिक स्वातंत्र्याही वाढले आहे  ग्रामीण भागातील या आAथिक कौटुcबbक व सामाजिक जीवन ही आमुलाग्र बदलले आहे  आAथिक विकासाबरोबरच आपल्या गावांमधील अर्थकारण हे असेच बदलत जाणार आहे 

No comments:

Post a Comment

1 असा आहे अहमदनगर जिल्हा!

 असा आहे अहमदनगर जिल्हा! डाॅ  बारहाते जी  एच दि  २६ जानेवारी २०११ भारतीय द्विपकल्पाच्या उत्तर पश्चिम भागात वसलेला महाराष्ट्र हा प्रामुख्याने...